शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणे यांनी अत्रे कट्ट्यावर व्यक्त केली अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 16:15 IST

अत्रे कट्ट्यावर लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक सदानंद राणे यांनी लोककला आणि लोकनृत्याची माहिती प्रेक्षकांना दिली.

ठळक मुद्देलोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणेराणे यांनी प्रेक्षकांना दिली लोककला आणि लोकनृत्याची माहिती अत्रे कट्ट्यावर ‘लोकगंगा आपुल्या दारी’ या विषयावर व्याख्यान

ठाणे: शासनाचे लोककलेच्या कलाकारांकडे लक्ष नाही. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटली तरी या कलाकारांच्या उपजिवीकेचे साधन कमी होत चाललेले आहे. म्हणूनच लोककला अस्त होत आहे. लोककलेला व्यासपीठ मिळत नाही अशी खंत व्यक्त करीत लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक सदानंद राणे यांनी लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर ‘लोकगंगा आपुल्या दारी’ या विषयावर राणे यांचे व्याख्यान ध्वनी चित्रिफतीसह आयोजित केले होते. यावेळी ते म्हणाले की, भारत हा देश सर्वगुण संपन्न देश आहे. समृद्ध, संस्कृती, लोककला, लोकनृत्य, परंपरा या सर्व गोष्टी आपल्या देशात आहेत. लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे असे शासनाला सांगितले आहे. किमान महाराष्ट्रातील लोककला, लोकनृत्याचे डॉक्युमेंटेशन करावे, जेणेकरुन याची माहिती तरुण पिढीला होईल. परदेशातील लोक आपल्या देशात येऊन आपली लोकलला शिकून त्यांच्या देशात शिकवत आहेत. परदेशातील लोकांना भारतीय लोककलेचे प्रचंड आकर्षण आहे, ते याचा अभ्यास करतात, आपली लोक मात्र याबाबत उदासीन आहेत अशी नाराजी राणे यांनी बोलून दाखविली. लोककला, लोकनृत्य हे दोन वेगळे भाग आहेत. परंपरेनुसार लोकनृत्य हे पहिले आहे. पाच हजार वर्षांपासून लोकनृत्य परंपरा आहे. आदीवासी समाजाने ही परंपरा उचलली. त्यांच्या कामातून, श्रमातून निरनिराळ््या गोष्टी येऊ लागल्या, अवजारातून गाणी निर्माण केली. प्रत्येक जमात त्यांचा जो पारंपारिक व्यवसाय करत आले, त्या व्यवसायातील अ‍ॅक्शन नृत्यात येत गेल्या. प्रत्येक जिल्ह्यात लोकनृत्याचा फरक आहे. लोककला जोपासणे कठिण आहे. कला चालली पाहिजे, घरही चालले पाहिजे याचा मेळ घालणे कठिण आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी ध्वनी चित्रिफतीच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील लोकनृत्य दाखवून त्याची त्यांनी माहिती दिली. यात बोहाडा, पश्चिम महाराष्ट्राचे डहाका, भारुड, नागपूरमधील खडी गंमत, कोकणातील नमन, आदीवासींचे उरण तालुक्यातील डेंगा नृत्य, सांगली जिल्ह्यातील धनगर नृत्य, गोव्याचे तिक्री नृत्य, गुजरातमधील राठवा नृत्य, महाराष्ट्र - गुजरातच्या सिमेवर केले जाणारे डांगी नृत्य, राजस्थानचे तेरह ताली अशा विविध लोकनृत्यांची त्यांनी प्रेक्षकांना मनोरंजक माहिती दिली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई