शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ, बदलापूरमध्येही डॉक्टरांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:03 IST

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी डॉक्टरांचे शासनाला निवेदन

अंबरनाथ/बदलापूर : पश्चिम बंगाल येथे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या विरोधात आॅल इंडिया मेडिकल असोसिएशनने सोमवारी बंद पुकारला होता. या बंदमध्ये अंबरनाथ मेडिकल असोसिएशनही सहभागी झाले होते. अंबरनाथमधील डॉक्टर संघटनेने तहसीलदार जयराज देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांनाही पत्र देऊन आपला निषेध व्यक्त केला.अंबरनाथ मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. उषा महेश्वरी, डॉ. राकेश पटेल, यतीन भिसे, गौतम जटाले यांच्यासह शहरातील अनेक बडे डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी शांततेत आंदोलन करीत तहसीलदारांना निषेध व्यक्त करणारे पत्र दिले आहे. या बंद दरम्यान काही रुग्णालयात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आली होती. जेणेकरुन रुग्णांच्या जिवावर हे आंदोलन बेतणार नाही.अशाच प्रकारचे आंदोलन बदलापूरातील डॉक्टरांनीही केले. बदलापूरातील डॉक्टरांनी तहसिलदारांना आपल्या निषेधाचे पत्र दिले. तसेच सांकाळी ६ वाजता डॉक्टरांनी आंबेडकर चौक ते गांधी चौक पर्यंत मूक मोर्चा आयोजित केला होता.भिवंडी : पश्चिम बंगाल येथे सरकारी रूग्णालयांत रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याचा निषेध करण्याच्या हेतूने सोमवारी सकाळी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध सभा घेऊन डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन उप विभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना देण्यात आले.इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरातील शंभर हॉस्पिटल मधील बाह्यरूग्ण विभाग बंद ठेऊन आपत्कालीन सेवा सुरू ठेवल्या होत्या. तसेच निषेध सभा घेऊन शासनाने डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करावी, हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करावा, शिकाऊ डॉक्टर काम करीत असलेल्या ठिकाणी संरक्षण देण्याची व्यवस्था करावी,अशा विविध मागण्यांचे निवेदन तयार करून ते डॉक्टरांनी सामुहीकरित्या उपविभागीय कार्यालयांत जाऊन प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांना दिले.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप