शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तलवाडा आरोग्य केंद्राला मिळाले डॉक्टर

By admin | Updated: June 23, 2017 05:05 IST

तालुक्यातील तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा श्रमजीवीने देताच या केंद्रात डॉ़ दिलीप चंद्र यादव यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : तालुक्यातील तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा श्रमजीवीने देताच या केंद्रात डॉ़ दिलीप चंद्र यादव यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली.या केंद्रांतर्गत असलेला संपूर्ण भाग हा शंभर टक्के आदिवासी असल्याने पावसाळयात साथीचे आजार बळावत असतांत तर संर्पदंश, विंचू दंश यासारखे रुग्णही कायम असतात, असे असतांनाही येथे गेल्या एक वर्षापासून डॉक्टर नाहीत, मार्च मध्ये एका डॉक्टरची बदली झाली असल्याने ती जागाही रिक्तच आहे़ व याठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ रितेश पटेल यांची नेमणूक केली होती.मात्र तेही येथे फिरकत नसल्याचे पार्श्वभूमीवर तालुका श्रमजीवी संघटनेच्या वतीने तलवाडाआरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्याचे वृृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच त्याची दखल घेऊन जिल्हापातळीवरुन हालचाली होऊन गुरुवारी ते हजर झाले आहे़त तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या महिनाभराच्या कामांचा तपशिल देऊन तसा खुलासा सादर केला आहे़ मात्र मेढी येथील आरोग्य उपकेंद्रांत मार्च महिन्यापासून नर्स उपलब्ध नसल्याने लसीकरण झालेले नाही़ याचा परिणाम येथील लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे गाव-खेडयापाडयातील आदिवासींची मोठी गैरसोय होत असल्याने २२ रोजीची आंदोलन होईल अशी माहिती श्रमजीवीचे तालुका संघटक रुपेश डोले यांनी पत्रकारांना या पार्श्वभूमीवर दिली़ व असेही सांगण्यात आले की आम्ही राबवित असलेल्या योजनेत डॉ़ रितेश पटेल दाखवा आणि २ हजार मिळावा तर हे बक्षिस आज दादडे येथील कृष्णा कासट यांनी पटेल डॉक्टरांना प्रथम दाखवून पटकविले आहे़ डॉ. पटेल यांनी दिली सबबींची जंत्रीप्रत्येक सोमवार व बुधवारी मी उपस्थित असतो़ जिल्हा स्तरावर महिन्यातून एक जि़ आ़ अधिकारी, तालुका आरोंग्य अधिकारी व वैदयकिय अधिकारी यांची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बालमृत्यू व एन आर एच एम बैठक असते जिल्हा आरोग्य अधिकारी समिती बैठक तसेच वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आदेशित केलेल्या जिल्हास्तरीय बैठकांकरीता उपस्थित राहावे लागते़, असा खुलासा पटेल यांनी केला आहे.सन-२०१७-१७ पासून विक्रमगड तालुका (जास्त बालमृत्यू दर असलेला तालुका) घोषित करण्यात आलेला आहे़ या विषयी तालुक्यातील प्रा़ आरोग्य केंद्र, जोखीमीची उपकेंद्रे, जोखीमीची गावे, येथे जिल्हास्तरीय विभागीयस्तरीय, राज्यस्तरीय, नोडल अधिकारी यांच्या सोबत कामकाजाचे निरिक्षण सनियत्रण व मुल्यमापन करण्याकरीता कार्यक्षेत्रात त्यांच्या सोबत उपस्थित राहावे लागते. किंवा स्वत: कार्यक्षेत्रात भेटी द्याव्या लागतात़तालुकास्तरावर पंचायत समिती मासिक आढावा व तालुक्यातील कर्मचारी व डॉक्टर यांच्या आढावा सभेस उपस्थित राहावे लागते़ प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे आठवडयाच्या दर शुक्रवार व शनिवार ठरलेल्या दिवशी मी उपस्थित असतो़ परंतु या दिवशी तालुका अथवा जिल्हास्तरावर सभा असल्यास किंवा कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी यांचे कामाकरीता कुठलीही भेट असल्यास तिथे उपस्थितीत राहावे लागते़मागील १ वर्षापासून प्रा़ आ़ केंद तलवाडा येथील वैद्यकिय अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्याभार सांभाळत असून मागील एका वर्षापासून येथील रुग्णांची डॉक्टरं नांही किंवा रुग्णवाहिका नाही किंवा आरोग्य सेवा मिळत नाही अशी कुठलीही तक्रार तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर झालेली नाही. प्रा़ आ़ केद्रांतील कुंटुंब कल्याण स्त्री़ व पुरुष शस्त्रक्रिया शंभर टक्के राबवून व इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्र यांचे नियोजन व उदिष्टय साध्य शंभर टक्के करण्यांत आले आहे़ असेही त्यांनी म्हटले आहे.