शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरअभावी १०८ रुग्णवाहिकेची सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:14 IST

शासनाने गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आणि तात्काळ सेवा मिळावी यासाठी ‘रुग्णालय तेथे १०८’ ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली.

मुरबाड : शासनाने गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आणि तात्काळ सेवा मिळावी यासाठी ‘रुग्णालय तेथे १०८’ ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. मात्र दोन महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने ही सेवा ठप्प झाली आहे. परिणामी, खाजगी वाहनांचे चांगलेच फावले आहे.ही सेवा सुरू झाल्याने गर्भवती असो अथवा अपघातग्रस्त त्यांना असेल तेथून तात्काळ हव्या त्या रुग्णालयात पोहोचवले जाते. शिवाय या रुग्णवाहिकेत चालकासोबत तज्ज्ञ डॉक्टर असल्याने हजारो महिलांची प्रसूती सुखरूप झाली. तर शेकडो अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. यामुळे १०८ ही सेवा संजीवनी ठरली असताना टोकावडे ग्रामीण रुग्णालयातटोकावडे हा अतिदुर्गम भाग कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने महामार्गावरील अपघात तसेच, सर्पदंश, विंचूदंश, गर्भवतींना योग्य आणि तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शासनाने ग्रामीण रुग्णालय सुरू केले. एखादा रु ग्ण सिरीयस असेल आणि त्याच्यावर टोकावडे येथे उपचार करणे अशक्य असेल, तर पुढील उपचारांसाठी ताबडतोब रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने सुरू केलेली १०८ ही सुसज्ज अशी एक चालक आणि सोबतीला तज्ज्ञ डॉक्टर अशी रुग्णवाहिका टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिली. मात्र, दोन महिन्यांपासून रुग्णवाहिका आहे, डॉक्टर नाही. अशी परिस्थिती असल्याने कल्याण - नगर महामार्गावर होणारे अपघात, गर्भवतींना ताबडतोब सेवा मिळत नाही. एखादी अपघातग्रस्त किंवा प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर टोकावडे येथे उपचार होत नसतील तर उल्हासनगर किंवा जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी ३० किमी अंतरावरील मुरबाड अथवा किन्हवली येथून १०८ ही रुग्णवाहिका मागवावी लागते. मात्र, यामुळे विलंब होत असल्याने रु ग्ण दगावण्याची शक्यता असते, किंवा खाजगी वाहनाची सोय करावी लागते. परंतु, सर्वसामान्य माणसाला खाजगी रुग्णवाहिकेचा खर्च परवडणारा नसल्याने कधी कधी जीवावर बेतण्याची शक्यता असते.