ठाणे : जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर जावेद खान यांना झालेल्या मारहाणप्रकरणी, ठाणे महागिरीतील सैफ शेख (२०) याला ठाणेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या ५ झाली आहे. बुधवारी दुपारी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी, सलाइन लावण्यावरून डॉक्टरांशी वाद घालून, डॉक्टर खान यांना मारहाण करीत रुग्णालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर, बुधवारी रात्री ठाणेनगर पोलिसांनी चौघांना अटक केले. (प्रतिनिधी)
डॉक्टर मारहाण; आणखी एक अटकेत
By admin | Updated: April 1, 2017 03:32 IST