शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदींसाठी कर्ज घ्यायचे का?, राज ठाकरे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:08 IST

केंद्र सरकार सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे बांधत आहे. मात्र, हे दोन्ही प्रकल्प महाराष्टÑ तसेच देशालाही उपयोगाचे नाहीत.

शहापूर : केंद्र सरकार सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे बांधत आहे. मात्र, हे दोन्ही प्रकल्प महाराष्टÑ तसेच देशालाही उपयोगाचे नाहीत. मग, काय एकट्या नरेंद्र मोदींसाठी कर्ज डोक्यावर घ्यायचे का, असा सवाल महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. गुरुवारी शहापूर दौऱ्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज ठाकरे यांनी पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांत मंगळवारपासून दौरा सुरू केला. बुधवारी ते शहापुरात होते. मनसेचे तालुकाध्यक्ष जयवंत मांजे यांच्या नेतृत्वाखाली बाइक रॅली काढून मनसेतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रॅली बाजारपेठेत आल्यानंतर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर, पंचायत समितीजवळील शिवस्मारकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला.तसेच शासकीय विश्रामधाम येथे ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी शिवसेना आणि भाजपाच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. कोणताही प्रकल्प आला की, आधी त्याला विरोध करायचा.विरोध झाला की, त्या प्रकल्पाची किंमत आपोआप वाढते. मग, तेथे राजकीय लोकांची दलाली सुरू होते. या प्रकल्पासाठी जमीन देण्यास एखादाच शेतकरी गेला की, त्याला कमी मोबदला दिला जातो.मात्र, तीच जमीन मग राजकीय दलालामार्फत दिल्यास तिला जास्त मोबदला मिळतो. अशा प्रकारे राजकीय दलाली करून पैसे कमवायचे, पैसा आला की सत्ता मिळवायची आणि सत्ता आल्यानंतर पुन्हा पैसे कमवायचे, असाच सारा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. तर, रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाबाबत अजूनही निश्चित भूमिका घेता येत नसल्याबद्दल त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे