शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालयांसाठी सरकारवर ताण नको, विजय बेडेकर यांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:51 IST

ग्रंथालयांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण सरकारवर अवलंबून राहू नये. आजची ही वर्षानुवर्षाची परंपरा असलेली अनेक ग्रंथालये आपण सर्वांनी एकत्र येऊन उभारलेली आहेत. शासनावरचा ताण आपण कमी केला पाहिजे. सरकार ही बधीर यंत्रणा आहे.

ठाणे  - ग्रंथालयांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण सरकारवर अवलंबून राहू नये. आजची ही वर्षानुवर्षाची परंपरा असलेली अनेक ग्रंथालये आपण सर्वांनी एकत्र येऊन उभारलेली आहेत. शासनावरचा ताण आपण कमी केला पाहिजे. सरकार ही बधीर यंत्रणा आहे. आपण थकू पण ते थकणार नाही. त्यामुळे आपण आपले काम करण्यात जास्त फायदा आहे, असे परखड मत डॉ. विजय बेडेकर यांनी ग्रंथालय संमेलनात व्यक्त केले.शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात वाचनालयांच्या स्वरूपावर ते बोलत होते. या सत्रात अच्युत गोडबोले, प्रा.नारायण बारसेही सहभागी झाले होते. गेल्या काही काळात ग्रंथालयांचे स्वरूप आमूलाग्र बदलते आहे. ग्रंथालये ही आता गोडाऊन राहिलेली नाहीत. उद्याचा विचार करायचा असेल, तर ग्रंथालयांपेक्षा वाचकांनी बदलले पाहिजे. वाचक मागणी करतील तेव्हा ग्रंथालयांमध्ये बदल होईल.ग्रंथालये बदलून वाचक बदलणार नाही. तर डिजिटलायजेशनच्या जगात मराठीचा विचार तातडीने करायला हवा. त्यासाठी आपल्याला प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या यांत्रिकीकरणाच्या बाबतीत आपण १० व्या पायरीवर आहोत. ते १०० व्या पायरीवर जाण्याची गरज आहे, असे डॉ. बेडेकर म्हणाले.आज ग्रंथालयांमध्ये व्हरायटी पाहायला मिळते. काही ठिकाणी खूप पुस्तके आहेत मात्र त्याची योग्य मांडणी नाही. कामात सुसूत्रता नाही, अशी परिस्थिती दिसते. तर काही ठिकाणी पुस्तके कमी असली, कर्मचाºयांना पुरेसा पगार , सुविधा नसल्या तरी काम मात्र सुनियोजित पद्धतीने चालते. सरकारी लायब्ररींची अवस्था तर आणखी वेगळी असते. मात्र उद्याच्या काळात संग्रहालयांचे डिजिटलायझेशन होऊन त्याच्या स्वरूपात बदल झाले तरी वाचकाची गरज भागवणे हे त्यांचे महत्त्वाचे काम आहे, असे अच्युत गोडबोले म्हणाले.प्रा. नारायण बारसे यांनीही याविषयी माहिती दिली. भारतात केवळ २० राज्यांमध्ये ग्रंथालय कायदा मंजूर झाला आहे. आपण पुरोगामी समजणाºया महाराष्टÑातही कायदा मंजूर व्हायला १९६८ सालाची वाट पाहावी लागली.गेली अनेक वर्षे ग्रंथ-ग्रंथालये भविष्यात राहतील का, असे प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र बदलत्या काळानुसार गं्रथालयांमध्ये खूप बदल होणार असले तरी ग्रंथ आणि ग्रंथालये टिकून राहणार आहेत. तसेच खाजगी ग्रंथालये कितीही अ‍ॅडव्हान्स झाली, तरी सार्वजनिक वाचनालयांची गरज कायम असणार आहे, असे मत प्रा.बारसे यांनी व्यक्त केले. मिलिंद भागवत यांनी या सर्वांना या विषयावर बोलते केले.दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन आवश्यकठाणे : दुर्मीळ पुस्तकांचे योग्य पद्धतीने डिजिटलायझेशन झाले नाही, तर ही पुस्तके पुढच्या पिढीला उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे या पुस्तकांचे जतन करणे, स्कॅनिंग करणे ही आताच्या पिढीची जबाबदारी आहे, असे मत लेखक, प्रकाशक, संगणकीय तंत्रज्ञानतज्ज्ञ माधव शिरवळकर यांनी रविवारी व्यक्त केले.शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात ‘डिजिटलायझेशन आणि इ बुक्स’ यावरील प्रात्यक्षिकावेळी ते बोलत होते. सुरूवातीला शिरवळकर यांनी पुस्तकांच्या डिजिटलायझेशनचे स्वरुप सांगताना फक्त स्कॅनिंग की आणखी काही? आजच्या ग्रंथालयांमध्ये वापरले जाणारे स्कॅनर्स, सामान्य फ्लॅट बेड स्कॅनर, स्वयंचलित ओव्हरहेड स्कॅनर या मुद्दयांवर प्रकाश टाकला.दोन मराठी पुस्तके डाऊनलोड करुन ती मोबाईल फोनवर वाचण्याच्या प्रात्यक्षिकावर ते बोलले. संगणकशास्त्र व डिजिटलायझेशन- ईबुक्स तज्ज्ञ राहुल गुंजाळ यांनी डिजिटलायझेशनच्या गरजेवर थोडक्यात माहिती देताना १० हजार पुस्तके या फॉर्ममध्ये रूपांतरीत झाल्याचे सांगितले.त्यानंतर स्टेजेस आॅफ डिजिटलायझेशनचा तपशील त्यांनी दिला. ५० ते ६० वर्षे जुनी किंवा त्यापूवीर्ची किंवा जी पुन्हा प्रकाशित होणार नाहीत, अशी दुर्मीळ पुस्तके, जुनी वर्तमानपत्रे, हस्तलिखिते यांचे डिजिटलायझेशन केले पाहिजे, असा आग्रह गुंजाळ यांनी धरला.ग्रंथालयांचा गौरवच्संजीव ब्रह्मे, दा. कृ. सोमण, विद्याधर वालावलकर, विद्याधर ठाणेकर, चांगदेव काळे, पद्माकर शिरवाडकर, हेमंत काणे, महादेव गायकवाड आदींच्या उपस्थितीत सायंकाळी समारोप सोहळा पार पडला.च्यावेळी उत्कृष्ट उपक्र म राबविणाºया ग्रंथालयाना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यात प्रथम पारितोषिक पुणे मराठी ग्रंथालय, द्वितीय पारितोषिक कोल्हापूरचे करवीरनगर वाचन मंदिर, तृतीय पारितोषिक इचलकरंजीचे आपटे वाचन मंदिर, उत्तेजनार्थ पुरस्कार साताºयातील छत्रपती प्रतापिसंह महाराज (थोरले) नगर वाचनालय आणि सांगलीतील जिल्हा नगर वाचनालयाला देण्यात आला.च्त्यानंतर पुणे मराठी ग्रंथालय व करवीर नगर वाचन मंदिराने पीपीटीद्वारे आपल्या वाचनालयाचा प्रवास उलगडला. पसायदानाने कार्यक्र माची सांगता झाली.

टॅग्स :thaneठाणे