शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पूल पाडू नका, डागडुजी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:57 IST

डोंबिवली पूर्व-पश्चिेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक झालेला नाही.

कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक झालेला नाही. त्याची दुरुस्ती करता येऊ शकते. या पुलावर महापालिकेने डांबरीकरण केले आहे. तसेच, दुतर्फा पदपथाचे कामही केले आहे. त्यामुळे पुलावर वाढलेला भार हलका करण्याची तयारी केडीएमसीने दर्शवली आहे. पुलाची दुरुस्ती करताना पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याची मागणी महापालिकेच्या लोकप्रतिनिधींनी मंगळवारी झालेल्या बैठकीत केली. मात्र या बैठकीतून ठोस काही निर्णय झाला नाही. त्यामुळे बुधवारी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे होणाऱ्या बैठकीतून ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.२७ मे पासून कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने महापालिकेस मिळाल्याने लोकप्रतिनिधींनी पूल बंद करण्यासंदर्भात विरोध केला. पुलासंदर्भातील आयआयटी संस्थेचा अहवाल मागितला गेला. रेल्वेकडे विविध प्रश्नांच्या माध्यमातून विचारणा केली गेली. तसेच पूल बंद केल्यास पर्यायी वाहतुकीचा पर्यायी मार्ग म्हणून ठाकुर्लीचे रेल्वे क्रॉसिंग खुले करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसेने या प्रकरणी दोन दिवसांचा अल्टिमेट महापालिकेस दिला होता. जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन केले होते.महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीस महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ, मनसे गटनेते मंदार हळबे, मध्य रेल्वेचे अधिकारी, शहर अभियंता आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत महापालिका प्रशासनाने रेल्वेकडे पूलासंदर्भातील आयआयटीचा अहवाल मागविला होता. त्यानुसार हा अहवाल सदस्यांसह आयुक्तांना दिला गेला. या अहवालानुसार पुलाचा डेस्क स्लॅब कमकुवत झाला आहे. तसेच पुलाच्या सळया उघड्या पडल्या आहेत.पॅराफीट वॉल खराब झाली आहे. स्टीलचे गर्डर गंजले आहेत. पुलासाठी केलेले काँक्रिटीकरण खराब झाले असून कॉलम बीमही दुरुस्त करावे लागणार आहे. अहवालातील मुद्द्यानुसार पूल तातडीने पाडण्याची गरज नाही. वाहतुकीसाठी पूल पूर्णपणे बंद न करता ही दुरुस्ती करा, अशी मागणी सदस्यांनी बैठकीत केली. तसेच पुलाची दुरुस्ती करण्यासाठी पूल बंद ठेवायचा झाल्यास ठाकुर्ली येथील रेल्वे क्रासिंग खुले करून द्यावे, अशीही सदस्यांनी मागणी केली. त्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची दुरुस्तीदरम्यान वाहतूक पूर्ण बंद ठेवावी की पर्याय म्हणून रेल्वे क्रॉसिंग खुले करावे, याचा निर्णय विभागीय व्यवस्थापक घेऊ शकतात. हा निर्णय आमच्या हाती नाही. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा बुधवार, २९ मे रोजी विभागीय व्यवस्थापांकडे बैठक होणार आहे. या बैठकीला खासदारडॉ. श्रीकांत शिंदे हे उपस्थितराहणार आहेत.>दुरुस्ती होणारपुलावर सातत्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच, पुलाच्या दुतर्फा पादचाºयांसाठी पदपथाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पुलावरचा भार वाढला आहे. डांबराचा थर व पदपथासाठी वापरलेले सिमेंट काँक्रिटीकरण काढण्याची कार्यवाही महापालिकेकडून तातडीने केली जाईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच पुलाच्या खालच्या भागाची दुरुस्ती तातडीने सुरू केली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.