शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वन कार्यालय नव्हे गोठा

By admin | Updated: August 17, 2016 02:20 IST

भिवंडी तालुक्यातील पारिवली वनविभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. पंधरा वर्षापासून येथील कामकाज भिवंडी वनक्षेत्रपालांच्या कार्यालयामधून सुरु आहे.

रोहिदास पाटील,  अनगावभिवंडी तालुक्यातील पारिवली वनविभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. पंधरा वर्षापासून येथील कामकाज भिवंडी वनक्षेत्रपालांच्या कार्यालयामधून सुरु आहे. वनअधिकाऱ्यांसह कर्मचारीही कार्यालयाकडे फिरकत नसल्याने वीस गावे, सहा पाड्यांच्या शेतकऱ्यांना आपल्या कामाकरिता ससेहोलपट करावी लागत आहे. तर येथील नागरिकांनी आपल्या सोयीनुसार कार्यालयाच्या मागील बाजूस बैल बांधून गोठाच तयार केला आहे.ठाणे व भिवंडी वनविभाग यांच्या अखत्यारित पारिवली वन विभागाचे कार्यालय आहे. आदिवासींसह संमिश्र लोकवस्ती आहे. वनहक्क कायद्यानुसार आदिवासींना वनपट्टे मिळतात. त्याची माहिती व कातकरी समाजाची जमीन नावे करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पारिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मात्र येथे येणाऱ्या आदिवासींना कार्यालयास कुलूप बघून परतावे लागत आहे.पंधरा वर्षापासून इमारतीची दुरुस्ती न केल्याने ती कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. वनअधिकारी, कर्मचारी येत नसल्याने त्याची देखभाल होत नाही. अस्वच्छता पसरली आहे. इमारतीचे कौले तसेच दरवाजा, खिडक्या तुटलेल्या आहेत. दोन खोल्यांमधील लाद्याही तुटलेल्या आहेत. पाठीमागील खोल्याच्या मोकळ्या जागेत स्थानिकांनी एका खोलीत बैल बांधून गोठा बनविला आहे. तर दुसऱ्या खोलीमध्ये शेतीचे साहित्य ठेवले आहे. वनविभागाच्या या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये गुरांचा गोठा जर तयार होत असेल तर वनविभाग झोपा काढतोय का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. वनाधिकारी आय.एस. ठाकूर व त्यांचे सहकारी येथे फिरकत नसल्यामुळे कार्यालयाचा उकिरडा झाला आहे. शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.या इमारतीची दुरुस्ती करावी यासाठी वन विभागाने ठाणे वन विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही साधी दुरुस्तीही करण्यात न आल्याने प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. वन विभागाने या इमारतीला निधी मंजूर करुन नव्याने बांधकाम करण्याची मागणी होत आहे.