शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात जाऊ नका, जरा थांबा...

By admin | Updated: May 27, 2017 02:16 IST

प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाला वर्ष उलटून गेले तरी त्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल तयार न झाल्याने हा अहवाल सरकारी यंत्रणांकडून दाबला जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाला वर्ष उलटून गेले तरी त्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल तयार न झाल्याने हा अहवाल सरकारी यंत्रणांकडून दाबला जाण्याची शक्यता व्यक्त करता त्याविरोधात महिनाभरात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा डोंबिवली वेल्फेअर असोशिएशनने देताच त्यांची गंभीर दखल उपजिल्हाधिकारी प्रसाद उकीरडे यांनी घेतली आहे. असोशिएशनचे सचिव राजू नलावडे यांना ‘जरा थांबा, न्यायालयात जाऊ नका. अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे,’ असे त्यांनी सुचवले आहे. लवकरच अहवाल तयार केला जाईल, असे त्यांनी नलावडे यांना सांगितले. मात्र हे आश्वासन लेखी स्वरुपात दिल्यास ते असोशिएशनच्या बैठकीत मांडले जाईल. त्यानंतरच काय ते ठरवू. पण तूर्तास न्यायालयात जाण्याच्या निर्णयावर असोशिएशनच ठाम असल्याचे नलावडे यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे स्पष्ट केले. ‘प्रोबेस स्फोटचा अहवाल दाबला?’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध होताच उपजिल्हाधिकारी उकीरडे यांनी नलावडे यांच्याशी संपर्क साधला. असोशिएनने लगेच न्यायालयात जाऊ नये. अहवाल तयार करण्यास उशीर झाला आहे, पण काम आता अंतिम टप्प्यात आहे. दीड महिन्यात अहवाल तयार केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर नलावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवालाबाबत सुरू असलेली टाळाटाळ, वारंवार दिली जात असलेली आश्वासने यांचा दाखल देत न्यायालयात गेल्याशिवाय समितीला अहवाल सादर करण्याची जाग येणार नाही, अशी भूमिका मांडली आणि आपला न्यायालयात दाद मागण्याचा पवित्रा, त्यामागची भूमिका स्पष्ट केली. असोशिएशनने महिनाभराची मुदत दिली आहे. हा असोसिएशनचा निर्णय आहे. स्फोटात नुकसान झालेल्यांचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यांची सात कोटी ४३ लाखांची नुकसानभरपाई थकली आहे, हे नलावडे यांनी निदर्शनास आणून देताच त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु असल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रोबेस स्फोटामुळे निर्माण झालेला डोंबिवलीतील सुरक्षिततेचा प्रश्न, कारखान्यांतून होणारे प्रदूषण हे दोन्ही मुद्दे डोंबिवली शहराच्या जिवावर उठले आहेत. त्यातून डोंबिवलीचा भोपाळ होऊ नये, यासाठी मनसे इंदिरा गांधी चौकात २८ मे रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान मानवी साखळी तयार करणार आहे.प्रोबेस स्फोटामुळे नुकसान झालेल्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. डोंबिवलीतील धोकादायक कारखाने तातडीने शहराबाहेर स्थलांतरित करावे, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी ही मानवी साखळी केली जाईल, अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम व शहराध्यक्ष मनोज घरत यांनी दिली.