शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बिल्डरांना मोकाट सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:39 IST

रेरा हा कायदा अत्यंत चांगला तयार करण्यात आला आहे. या कायद्यान्वये प्रत्येक बिल्डरला नोंदणी करणे गरजेचे आहे.

कल्याण : रेरा हा कायदा अत्यंत चांगला तयार करण्यात आला आहे. या कायद्यान्वये प्रत्येक बिल्डरला नोंदणी करणे गरजेचे आहे. या कायद्यान्वये अधिकृत बिल्डर नोंदणी करणार आहेत. मात्र, ज्यांच्याकडून सर्रासपणे बेकायदा बांधकामे उभी करून नागरिकांची फसवणूक केली जाते, विकास आराखड्याचा बट्ट्याबोळ केला जातो. त्यांनाही रेराचा वचक असावा. त्यांना या कायद्याच्या कार्यकक्षेत आणावे, अशी मागणी वास्तुविशारद संदीप पाटील यांनी केली आहे.वास्तुविशारद पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यापूर्वी पाटील यांनी याप्रकरणी राज्यभरातील २८८ आमदार व ८८ विधान परिषद सदस्य यांचा याविषयी पत्र पाठवून या मागणीचा विचार करावा, हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करावा, असे आवाहन केले होेते. त्यापैकी मल्लिकाअर्जन रेड्डी व कल्याण पश्चिमेतील भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी पाटील यांच्या पत्राची दखल घेतली असल्याचे कळवले आहे. याविषयी विधिमंडळात लक्षवेधी सूचना उपस्थित केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.रेरा कायदा राज्यात १ मे २०१७ पासून लागू झाला. या कायद्यान्वये बिल्डरांनी त्यांच्या प्रकल्पाची नोंदणी ३१ जुलैपर्यंत करणे बंधनकारक होते. आज ही मुदत संपली. कारण, या मुदतीचा सोमवारी शेवटचा दिवस होता. पाटील यांनी या मुदतीचा पुनरुच्चार करत रेरा कायदा अत्यंत चांगला आहे. त्याद्वारे घरखरेदी करणाºया ग्राहकांची फसवणूक थांबणार आहे. त्यात शिक्षेची तरतूद असल्याने या कायद्याचे उल्लंघन करणाºया बिल्डरला तीन वर्षांची कैद व प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी १० टक्के दंड आकारला जाणार आहे.