शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

...तर भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:45 IST

दिव्यांगांनी प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी ‘मातोश्री’वर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला.

कल्याण : दिव्यांगांनी प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी ‘मातोश्री’वर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोर्चा त्याआधीच अडवण्यात आला. त्यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेल्या आश्वासनाअंती आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, १५ दिवसांत मागण्या मंजूर करा, अन्यथा दीपावलीपासून शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांच्या घरांसमोर भीख मांगो आंदोलन छेडू, असा इशारा पुन्हा दिव्यांग सेनेने दिला आहे. या आंदोलनाची सुरुवात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून केली जाईल, अशी माहिती दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी दिली.शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिका आणि नगर परिषदांमध्ये दिव्यांग व्यक्तींची पुरती उपेक्षा झाली आहे. योजनांसाठी राखीव ठेवलेल्या निधीत भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप दिव्यांग सेनेने केला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग रविवारी थेट ‘मातोश्री’वर मोर्चा काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार होते. त्यानुसार, माहीम येथून मोर्चा निघाला. परंतु, तो शेकाप भवनची गल्ली पार करण्याअगोदरच पोलिसांनी अडवला. उद्धव ठाकरे हे शिर्डीला गेल्याची माहिती देत ‘मातोश्री’वरून शिष्टमंडळ आपल्या भेटीस येत आहे, त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना केले. महापौर महाडेश्वर यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांच्या आश्वासनाअंती आंदोलन स्थगित करण्यात आले.ठाकरे यांना मोर्चाची कल्पना दिली असताना त्यांनी पळ काढल्याचा आरोप दिव्यांग सेनेने केला आहे. मोर्चा स्थगित करताना मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ दिवसांची मुदत सेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास दीपावलीपासून भीख मांगो आंदोलन छेडण्याचा पवित्रा दिव्यांगांनी घेतला आहे. ‘मातोश्री’वर काढलेल्या मोर्चात सत्ताधारी शिवसेनेने पोलीस बळाचा वापर केला असला, तरी मागण्या मान्य न झाल्यास दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून छेडले जाणारे भीख मांगो आंदोलन अधिक आक्रमक असेल, असे साळवी यांनी सांगितले.।निधीचा चुकीच्या पद्धतीने वापरबहुतांश महापालिका आणि नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, वारंवार पत्रव्यवहार आणि निदर्शनास आणूनही कोणताही फरक पडत नसल्याने आंदोलनाचा दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे.कर्णबधिर, अंध, गतिमंद, शारीरिक अपंग यांची संख्या फार मोठी आहे. त्यांच्या समस्याही मोठ्या प्रमाणावर आहेत. पण, सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांचा तीन कोटींचा निधी काही ठिकाणी वापरला गेलेला नाही, तर काही महापालिकांमध्ये चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे.