शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत वाजवा डीजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 03:12 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी : पोलिसांना केल्या सूचना, ध्वनिमर्यादा पाळण्याचे आदेश

- सुरेश लोखंडे ठाणे : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी विविध अटींसह ध्वनीची विहित मर्यादा राखून गणपतीच्या या कालावधीसह नवरात्रोत्सवात सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास जिल्हा प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. याशिवाय, अन्य सणासुदीच्या कालावधीतही ध्वनिमर्यादा राखून डीजे वाजवण्यासाठी मार्गदर्शक सूचानाही पोलिसांना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत.उच्च न्यायालयातील जनहित याचिका, पर्यावरण विभागाचे आदेश आदींचा संदर्भ देऊन नियमांचे पालन करून ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवण्यासही परवानगी जारी केली आहे. कोणत्याही प्रकारचे ध्वनिप्रदूषण होणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना गणपती मंडळांना पोलिसांनी जारी केल्या आहेत. यामुळे डीजेचा आवाज ठिकठिकाणी मंदावलेला ऐकायला मिळत आहे. श्रोतागृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी डीजेला ध्वनीची विहित मर्यादा राखून वाजवण्यास परवानगी केली आहे.सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास परवानगी असली, तरी त्यासाठी दिवसही निश्चित केले आहेत. यामध्ये गणपती उत्सवादरम्यान केवळ चार दिवस डीजे वाजवण्याची मुभा आहे. यामध्ये दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी आदी दिवशी डीजे वाजवता येणार आहे. गणपतीनंतर नवरात्रोत्सवातीलही काही दिवस डीजे वाजवण्यासाठी निश्चित केले आहेत. यामध्ये अष्टमी व नवमीचा समावेश आहे. दिवाळीत केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डीजे वाजवता येईल. तर, ख्रिसमसला एक दिवस आणि ३१ डिसेंबरला केवळ एक दिवस डीजे वाजवण्याची मुभा देण्यात आली आहे.वर्षभरातील सणांसाठी मिळणार सवलत पण मर्यादा पाळूनया सणांच्या दिवसांप्रमाणेच वर्षभरात येणाºया सणांसाठीदेखील डीजेची ध्वनिमर्यादा राखण्याचे सूचित केले आहे. यामध्ये शिव जयंती, ईद-ए-मिलाद, आंबेडकर जयंती, १ मे महाराष्टÑ दिन आदी दिवशीदेखील ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवता येणार आहे.यासाठीदेखील सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंतच ध्वनिमर्यादा राखून डीजे वाजवता येणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त अतिरेक करून ध्वनिप्रदूषण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहेत.यास अनुसरून सध्या सुरू असलेल्या या गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी पोलिसांसह गणेश मंडळांकडून घेतली जात असल्याचे दिसते आहे. भक्तांनी देखील या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव