शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

धामणवाडीच्या आदिवासी कुटुंबांची दिवाळी झाली गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:13 IST

बदलापूरमधील आशीष गोळे यांनी आदिवासी बांधवांची दिवाळी गोड केली आहे. कोंडेश्वर परिसरात त्यांच्या मालकीची जागा असून त्या जागेपैकी काही जागेवर आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत.

पंकज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : दिवाळीनिमित्त आदिवासींना फराळ वाटणारे अनेक पाहिले असतील. मात्र, बदलापूरमधील एका बांधकाम व्यावसायिकाने चक्क आपल्या मालकीची जागाच आदिवासींना घरासाठी दिली आहे. आपली मालकी हक्काची जागा आदिवासी बांधवांना घरासाठी देत त्या आदिवासींची दिवाळी गोड केली आहे.

बदलापूरमधील आशीष गोळे यांनी आदिवासी बांधवांची दिवाळी गोड केली आहे. कोंडेश्वर परिसरात त्यांच्या मालकीची जागा असून त्या जागेपैकी काही जागेवर आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र, ही जागा खाजगी असल्याने त्यांचे घर त्यांच्या नावे होत नव्हते. तसेच इतर कोणतीही सुविधा पुरविताना जागामालकाची परवानगी घ्यावी लागत होती. या सर्व अडचणी लक्षात आल्यावर आमदार किसन कथोरे यांनी या आदिवासींचा प्रश्न निकाली काढण्यासाठी गोळे यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. गोळे यांनीही कोणताही विलंब न लावता या आदिवासी बांधवांना दिवाळी भेट दिली आहे. कोंडेश्वरजवळच असलेल्या धामणवाडी परिसरात ११० आदिवासी कुटुंबेेेे वास्तव्यास आहेत.

भोज धरणाच्या किना-यावर हे सर्व आदिवासी असून त्यांची घरे खाजगी जागेवर आहेत. त्यामुळे त्यांची घरे त्यांच्या नावावर होणे अवघड जात होते. त्यामुळे दिवाळीची भेट म्हणून गोळे यांनी या आदिवासींची घरे असलेली जागा त्यांच्या नावावर करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गोळे यांच्या या निर्णयामुळे आदिवासींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

या आदिवासी बांधवांचे आमच्यासोबतचे नाते हे कुटुंबाप्रमाणे आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्याला त्याच्या घराची जागा दिली, तर त्याचा आनंदच आम्हाला होत आहे. त्यांनीही प्रत्येकवेळी आम्हाला मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद देण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे.    - आशीष गोळे, जमीनमालक

आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी आमच्या हा प्रयत्न होता. हे आदिवासी अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतात. त्यांच्या कुटुंबाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे ११० कुटुंबांची कायमची सोय करण्यात आली आहे. भविष्यात आता कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत.    - किसन कथोरे, आमदार