शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दिवा रेल्वे फाटक धोकादायक!,‘आता तरी जागा हो दिवेकर’ संघटनेमार्फत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:59 IST

दिवा रेल्वे सुरक्षा बल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सद्यस्थितीत तिन्ही मार्गांवर १५ रेल्वे फाटक सुरू आहेत.

ठाणे : दिवा रेल्वे सुरक्षा बल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सद्यस्थितीत तिन्ही मार्गांवर १५ रेल्वे फाटक सुरू आहेत. त्यामध्ये दिवा रेल्वे फाटक सर्वात वर्दळीचे फाटक असल्याने ते दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले आहे. त्यामुळे भविष्यात येथे उड्डाणपुलाशिवाय पर्याय नसून तो व्हावा, यासाठी गुरुवारी दिवा रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.ठाणे-कल्याण या दोन रेल्वे जंक्शनमधील दिवा हे ब्रिटीशकालीन स्थानक आहे. येथून मध्य रेल्वे, दिवा-पनवेल आणि दिवा-वसई अशा तीन मार्गांवर रेल्वे धावतात. या तिन्ही मार्गांवर येणारे रेल्वे फाटक हे दिवा सुरक्षा बल पोलीस ठाण्यांतर्गत येतात. या तिन्ही मार्गांवर एकूण १६ रेल्वे फाटक आहेत. त्यातील एका फाटक ाजवळ भुयारी मार्ग सुरू झाल्याने ते फाटक एक वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीला दिवा-पनवेलवर ७ तर दिवा-वसईवर ७ फाटक आणि मध्य रेल्वेवर एक असे १५ फाटक सुरू आहेत. त्यातील दिवा सोडल्यास इतर रेल्वे फाटक परिसरात येजा करणारी वाहने असो या पादचारी यांची वर्दळ दिव्याच्या एक टक्के सुद्धा नाही. त्यामुळे या फाटकांवर सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रश्नच उद्भावत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच, सोमवारी झालेल्या दिवा रेल्वे फाटकावरील अपघातापूर्वी म्हणजे जवळपास एक वर्षांपूर्वी दातिवली येथे असाच एक रेल्वे अपघात झाला होता. पण, सुदैव्याने त्या घटनेत,कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती.दिवा रेल्वे फाटकावरील उड्डाल पूल स्थानिक गटबाजी आणि राजकारण्यांच्या दबावाला बळी पडला आहे. त्यामुळे तो होण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप दिव्यातील ‘आता तरी जागा हो दिवेकर’या संघटनेने केला. तर, प्रशासनाला जागे करण्यासाठी दिवास्थानकात स्वाक्षरी मोहीम आयोजित केली आहे.>फाटक ओलांडण्यात सायकलस्वार आघाडीवरदिवा रेल्वे फाटकांवर झालेल्या अपघातानंतर फाटक ओलांडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. तर, मागील तीन दिवसांत रेल्वे प्रशासनाने रेल्वे कायद्यान्वे १८ जणांवर कारवाई केली असून त्यामध्ये सर्वाधिक १२ जण हे सायकलस्वार असून उर्वरित सहा जण दुचाकीस्वार आहेत. बुधवारी दुपारीपर्यंत ९ जणांवर कारवाई केली असून ते सर्व जण सायकलस्वार आहेत. तर,अपघातानंतरही येथील नागरिकांची फाटकाखालीशिरकाव करून ते ओलांडण्याची सवय काही जात नसल्याचे दिसत आहे.