शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दिवा, मुंब्य्रामध्ये ३३६ वीजजोडण्या तोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:27 IST

दोन बिल्डरांवर गुन्हा दाखल : महावितरणची भरपावसात वीजचोरीविरोधात धडक कारवाई

ठाणे : महावितरणच्या वतीने दिवा परिसरातील मुंब्रादेवी कॉलनीत शुक्रवारी बेकायदा वीज वापरणाऱ्यांवर धडक कारवाई केली. यामध्ये दिवा-मुंब्रादेवी परिसरातील विविध नऊ इमारतींमधील ३३६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर, कारवाई केलेल्या इमारतीच्या भरत पाटील व राकेश पाटील या बिल्डरांवर मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर, शुक्रवारी केलेल्या कारवाईतील इमारतींच्या बिल्डरांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे.

महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम-पाटील यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. दिवा परिसरात वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला असता विविध इमारतींत बेकायदा वीजजोडणी घेतल्याचे लक्षात आले. यामुळे ट्रान्सफॉर्मरवर विजेचा भार वाढल्याने प्रामाणिक ग्राहकांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यानुसार, गुरुवारी एका इमारतीवर, तर शुक्र वारी आठ इमारतींवर कारवाई करत या इमारतींमधील ३३६ फ्लॅट/गाळ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये मनस्विनी इमारतीत ३०, जगन्नाथधाम ६३, क्रि श प्लाझा ३२, शंकर निवास ५७, मोरेश्वर गॅलक्सी इमारतीत ३१, यशरु द्र १९, अर्जुन रेसिडेन्सी इमारतीत ७० व साई सावली इमारतीत दोन बेकायदा जोडण्या आढळून आल्या. तर, गुरु वारी कारवाई केलेल्या जगन्नाथधाम ‘ईएफ’ इमारतीतील ३२ फ्लॅट/गाळेधारकांचा पुरवठा खंडित करून बिल्डरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही ग्राहकांनी नवीन जोडणीकरिता फक्त अर्ज केला असून त्यांच्या वीजजोडणीबाबत कारवाई करण्यात येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. या बेकायदा जोडण्यांमुळे महावितरणचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे सांगितले आहे. या कारवाईत भांडुप परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता पांडुरंग हुंडेकरी, अनिल पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. या कारवाईमुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

आठ पथकांमार्फत पोलीस बंदोबस्तात केली कारवाईवीजचोरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी वीजजोडणीधारक/ बिल्डर यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल. तसेच बेकायदा वीजवापराची रक्कम वसूल करण्यात येईल. तसेच शासनाच्या इतर संबंधित विभागांना याबाबतची माहिती देऊन त्यांना त्यांच्या कायद्याच्या तरतुदीअंतर्गत तपासणी करण्यासाठी कळवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सहव्यवस्थापकीय संचालक काळम-पाटील यांनी दिला आहे. बेकायदा जोडण्या असलेल्या इमारतींची संख्या मोठी असल्याने आठ पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात एक वरिष्ठ अधिकारी व पुरेसे कर्मचारी नेमण्यात आले होते. या कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण