शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. च्या पहिल्याच सभेत हक्कभंगाची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:52 IST

ठाणे जिल्हा परिषदच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विषय समिती सभापतींची नावे जाहिर होण्यापूर्वी काही सदस्यांनी सभापती म्हणून बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली होती

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विषय समिती सभापतींची नावे जाहिर होण्यापूर्वी काही सदस्यांनी सभापती म्हणून बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हा सभागृहाचा अपमान असून त्या सदस्यांवर हक्कभंग दाखल करा, अशी मागणी विरोधकांनी बुधवारी लावून धरली. या सभेत विरोधकांनी सत्ताधारी अध्यक्षांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधक आक्र मक होत असल्याचे पाहून अध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करून हा ‘विषय’ मारून नेला. त्यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात रंगणार पहिलाच सामना झडपड क्रिकेट सामन्यासारखा झाल्याचे दिसून आले.ठाणे जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजिली होती. यावेळी, पाच विषय समितींसह पंचायत समितीच्या ९ समिती सदस्यांची निवड प्रक्रिया घेण्यात येणार होती. दरम्यान, विषय समितीच्या सभापतींची घोषणा केली जात असताना विरोधकांनी आक्षेप घेऊन काही सदस्यांनी सभापती म्हणून नावे जाहिर होण्यापूर्वीच बॅर्नरबाजीसह वृत्तपत्रांना जाहिरात देऊन गाजावाजा केला.अशाप्रकारे सभागृहाचा अपमान करणाºया त्या नवनिर्वाचित सभापतींवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काही क्षण शाब्दीक चकमक झाली. ती वाढण्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी विरोधकांसमोर वारंवार दिलगिरी व्यक्त करून विषय मारून नेला. त्यानंतरच उर्वरित पंचायत समितीची बिनविरोध निवडणूक झाली. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार आदी उपस्थित होते.