शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 01:57 IST

१३ पदे रिक्त : रुग्णांची हेळसांड, पदे त्वरित भरण्याची जनतेकडून जोरदार मागणी

ठाणे : जिल्हा सामान्य (सिव्हील) रुग्णालयात क्लास-१ डॉक्टरांची संख्या अवघी सहाच असल्याने उर्वरित मंजूर पदांपैकी १३ पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची वानवा असल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.क्लास-२ डॉक्टरांपैकी नऊ डॉक्टर हे गेल्या काही महिन्यांपासून गैरहजर असून त्यांच्या जागी कंत्राटी डॉक्टर भरल्यानंतरही दोन जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यातच, क्लास-१ डॉक्टरांची संख्या कमी असल्याने क्लास-२ वरील डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्याचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाहिले जाते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह पालघर या जिल्ह्यातील ग्रामीण भागातून रुग्ण अजूनही उपचारार्थ येत आहेत. यामुळे ताप, सर्दी असो, विंचू किंवा सर्पदंश असो तसेच प्रसूती असो, यासाठी गोरगरीब रुग्णांची येथे नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते. त्यातच, रुग्णालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. तसेच हे रुग्णालय सुपरस्पेशालिटी होत असल्याने तूर्तास तेथील विभाग स्थलांतरित केले जात आहेत.या रुग्णालयात क्लास-१ डॉक्टरांची १९, तर क्लास-२ ची ३३ पदे मंजूर आहेत. क्लास-१ डॉक्टरांची सद्य:स्थितीत सहा पदे भरली आहेत. यापैकी एक डॉक्टर नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांची जागाही रिक्त झाल्याने पाच डॉक्टर कार्यान्वित आहेत. त्यामुळे जवळपास १४ पदे रिक्त राहिल्यानेही क्लास-१ डॉक्टर मिळत नसल्याची बोंब आहे. त्यातच क्लास-२ च्या डॉक्टरांची सद्य:स्थितीत सर्वच मंजूर असलेली ३३ पदे भरलेली दिसत आहेत. पण, त्यातील नऊ डॉक्टर गैरहजर असल्याचे दाखवून सर्व पदे भरल्याचे सांगण्यात आले. मध्यंतरी जिल्हाधिकारी आणि शल्यचिकित्सक यांच्या मान्यतेनुसार या नऊपैकी सात पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत. पण, दोन पदे रिक्त आहेत. ती लवकरच भरली जाणार आहेत.क्लास-१ डॉक्टरांनी पदे रिक्त असल्याच्या वृत्तास दुजोरा देऊन क्लास-२ वरील डॉक्टरांची पदे रिक्त नाहीत. मध्यंतरी, काही डॉक्टर गैरहजर होते. त्यांच्या जागी कंत्राटी पद्धतीने ती पदे भरली आहेत. तसेच या पदांसाठी मुलाखतीही लवकरच होणार आहेत.- डॉ. कैलाश पवार,जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

टॅग्स :thaneठाणे