शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

डायलेसिस रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय ठरतेय आधार; कोरोनामुक्तीनंतरही उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:49 IST

दोन युनिट कार्यरत; सात रुग्णांना मिळाला दिलासा

- पंकज रोडेकर ठाणे : कोरोनामुक्तीनंतरही सात डायलेसिस रुग्ण ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ येत आहेत. त्यामुळे या रुग्णांसह कोरोना रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय हक्काचे आधार केंद्र ठरत आहेत.जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय झाल्यावर शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात पॉझिटिव्ह गरोदर महिला, नवजात शिशुंसाठी आणि डायलेसिस रुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली गेली.

आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल झालेल्या ११ जणांवर डायलेसिस केले, त्यामधील ७ जणांनी कोरोनाला हरवले आहे. तर चौघे अद्याप ही पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत आहेत.या अकरांमध्ये सात पुरुष तर ४ स्त्री रुग्णांचा समावेश असून दोघे हे ५० च्या आतील आहेत तर उर्वरित ९ जण हे ५० च्या वरील वयोगटातील आहेत.

हे रुग्ण जिल्ह्यातील असून त्यामध्ये ठामपामधील ६, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी असे प्रत्येकी दोन तसेच एक रुग्ण हा कल्याण-डोंबिवली येथील असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्यांच्यासाठी जिल्हा रुग्णालयात डायलेसिसचे दोन युनिट तयार केले आहेत. त्या युनिटमध्ये जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन डॉ. नेताजी मुळीक, डॉ. सुजित शिंदे, संजना मुळीक यांचे पथक त्या रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुक्त रुग्णांना विशेष प्रमाणपत्र

कोरोनाला हरवून मुक्त झालेल्या त्या सात डायलेसिसच्या रुणांना जिल्हा रुग्णालयाकडून विशेष प्रमाणपत्र दिले गेले आहे. तरीदेखील त्या रुग्णांना डायलेसिससाठी जिल्ह्यातील कोणतेही रुग्णालयात सुरुवातीला घेत नव्हते. त्यामुळे त्या कोरोनामुक्त रुग्णांवर पुन्हा जिल्हा रुग्णालयात डायलेसिससाठी येण्याची वेळ ओढवली. तेथे उपचार करताना त्यांना विशेष सुरक्षिततेत त्या विभागात नेले जात असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात डायलेसिसचे उपचार केले जात आहेत. पण, त्या रुग्णांनी कोरोनाला हरवल्यानंतर त्यांना कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तरीसुद्धा त्यांना डायलेसिसचे उपचार इतर ठिकाणी मिळत नसल्याने त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधल्यावर त्यांच्यावर कोरोनामुक्तीनंतर सुरक्षिततेत डायलेसिस केले जात आहे.- डॉ. कैलाश पवार, शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ठाणे

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या