शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात घरघंटी व शिलाई मशीनचे आचारसंहिता काळात वाटप? महापालिकेचे कानावर हात

By सदानंद नाईक | Updated: April 3, 2024 17:46 IST

मनसेची कारवाईची मागणी

सदानंद नाईक, उल्हासनगर: निवडणूक आचारसंहितेमुळे घरघंटी व शिलाईमशीनचे वाटप महापालिकेने थांबविल्याचे सांगूनही, घरघंटी व शिलाईमशीनचे वाटप करते कोण? असा प्रश्न मनसेने करून कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली. शहरात घरघंटी व शिलाईमशीन वाटप होत असल्याचे प्रकार उघड झाले आहे.

 उल्हासनगर महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याणकारी योजने अंतर्गत ३ हजार २९८ शिलाईमशीन व घरघंटीसाठी महिलांकडून अर्ज मागविले होते. अर्जाची छाननी करून पात्रता यादीतील अर्जाची लॉटरी काढली. त्यानंतर विभागाने लॉटरीतील पात्र महिलांची यादी प्रसिद्ध केली. १३ मार्च रोजी यंत्र वाटपाचा प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम प्रांतकार्यालय प्रांगणात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाला. मात्र त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने, शिलाई मशीन व घरघंटी वाटपाचा कार्यक्रम थांबविण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यानंतरही एका महापालिका शाळेसह अन्य ठिकाणाहून महिलांना शिलाई मशीन व घरघंटी यंत्र वाटप होत असल्याचे उघड झाले.   मनसेने महापालिका आयुक्त अजीज शेख यांना याबाबत  चौकशीबव कारवाईची मागणी केली आहे.

 * मशीनचे वाटप वादात महापालिकेने शिलाईमशीन व घरघंटी वाटप निवडणूक आचारसंहितेनंतर करण्यात येईल असे सांगूनही शहरात शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप सुरू असल्याचा भांडाफोड झाला. याप्रकाराने मशीनचे वाटप वादात सापडले आहे.

 * निवडणूक विभागातील ते कर्मचारी कोण? घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचे काम करणारे काही कर्मचारी महापालिका निवडणूक विभागात बसल्याचा आरोप मनसेने केला. त्या कर्मचाऱ्यांना बसण्याची परवानगी महापालिकेने दिली का? असा प्रश्न निर्माण झाला. असाच प्रकार यापूर्वी नगररचनाकार विभागात उघड होऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

 * यंत्राचे वाटप करणारे कर्मचारी की पक्ष कार्यकर्ते? निवडणूक आचारसंहिता कालावधीत महिलांना फोन करून घरघंटी व शिलाई मशीन वाटप करणारे कर्मचारी की पक्ष कार्यकर्ते? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

 * आचारसंहिततेचे उल्लंघन? लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दरम्यान महिलांना शिलाई मशीन व घरघंटी वाटप केले जात आहे. हा प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.

 *यंत्र वाटपात महापालिकेचा सहभाग नाही...उपायुक्त सुभाष जाधव महापालिका महिला व बालकल्याण विभागाने शिलाईमशीन व घरघंटीच्या पात्र महिलांची यादी प्रसिद्ध केली. निवडणूक आचारसंहितामुळे वाटप थांबविण्यात आल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगून बाहेरच्या प्रकाराशी महापालिकेचे काहीएक घेणेदेणे नसल्याचे सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर