शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालक,  तरुणांना ‘एलबेनडॉले’ जंतनाशक औषधाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 02:26 IST

जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश

 

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाच्या या कालावधीनंतरही १ ते ६ वर्षांच्या बालकांसह जिल्ह्यातील १९ वर्षीय युवा-युवतींच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदी आरोग्ययंत्रणेकडून आठवडाभर म्हणजे ८ मार्चपर्यंत ’एलबेनडॉले’ या औषधी गोळ्यांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. या गोळ्या देऊन या युवा-युवती व बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्याभरात या आधीच पोलिओ डोस देण्याच्या दृष्टीने सक्रिय असलेल्या यंत्रणेव्दारे व आरोग्यविभाग आणि अंगणवाडीसेविका, मदतनीस यांच्याद्वारे या औषधी गोळ्या वाटप करण्यात येत आहे. यामुळे या बालकांसह शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य झाले आहेत. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून झाला आहे.  या गोळ्यावाटपाची ही मोहीम ८ मार्चपर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

कोविडमुळे घरोघरी करणार गोळ्यांचे वाटपठाणे : सरकारी, खासगी शाळा, अंगणवाडी केंद्र कोविडमुळे सद्य:स्थितीत बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन आरोग्य परिचारिका, कर्मचारी या औषधी गोळ्यांचे वाटप करणार आहेत. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणीकरिता जिल्हास्तरीय सुकाणू समिती गठित केली आहे. या समितीची बैठक नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसंचालक डॉ. गौरी राठोड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी रेंघे यांनी सांगितले.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान द्यावयाच्या गोळीचे प्रमाण तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी व शाळेच्या शिक्षकांना देण्यात आले आहेत.     - डॉ. मनीष रेंघे,जिल्हा आरोग्य     अधिकारी