शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसला मुरबाडमध्ये खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:01 IST

उद्धव ठाकरे यांची उपस्थिती । सुभाष पवारांनी बांधले शिवबंधन

मुरबाड : राष्ट्रवादी काँंग्रेसला मुरबाड तालुक्यात खिंडार पडले असून, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना भवनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

या वेळी शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई, राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा आदी उपस्थित होते. पवार यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती किशोर जाधव, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता गांगड, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे, मुरबाड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बोष्टे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्राजक्ता भावार्थे, दीपाली झुगरे, किसन गिरा, निखिल बरोरा, कल्याण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकर, रवींद्र टेंबे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. पवार यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात मोठे जाळे तयार केले आहे. गोटीराम पवार यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल ५० हजार मते मिळवली होती. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीतही मुरबाड विधानसभा मतदारसंघातून मुरबाड तालुक्यातून त्यांना आघाडी मिळाली होती. ठाणे जिल्हा परिषदेत पावणेदोन वर्षांपासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. त्यात पवार यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. यापूर्वी पवार यांनी मुरबाड पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत. पवार यांच्या सेना प्रवेशाने मुरबाडमधील राष्ट्रवादी काँग्रसेला चांगला धक्का बसला आहे.मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच अग्रक्र म दिला. शिवसेनेने कधीही पक्षभेद केला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ठाणे जिल्ह्यातील तळागाळापर्यंत शिवसेनेला आणखी मजबूत करण्यासाठी कार्य करणार आहोत. इतर पक्षांत प्रवेश करताना त्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी असते. मात्र, शिवसेनेत प्रवेश करताना शिवसैनिकांचा उत्साह पाहावयास मिळत असल्याचे पवार यांनी आवर्जून नमूद केले. 

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना