शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीने मिटला आई मुलामधील वाद

By admin | Updated: June 22, 2016 01:46 IST

सासू- सुनेतील वादाचे पर्यावसन आई आणि मुलामधील भांडणात होऊन अखेर भांडण पोलिसांपर्यंत गेले. मात्र याप्रकरणी चिखले तंटामुक्ती समितीच्या हस्तक्षेपाने समेट घडून या वादावर पडदा पडला आहे.

डहाणू/बोर्डी : सासू- सुनेतील वादाचे पर्यावसन आई आणि मुलामधील भांडणात होऊन अखेर भांडण पोलिसांपर्यंत गेले. मात्र याप्रकरणी चिखले तंटामुक्ती समितीच्या हस्तक्षेपाने समेट घडून या वादावर पडदा पडला आहे. चिखले गावातील रतन काळू तुंबडा या आदिवासी महिलेचे सुने बरोबर नेहमी भांडण व्हायचे. गेल्या काही महिन्यांपासून दोघींमधील धुसफूस वाढून एकमेकींवर जादूटोणा केल्याचे आरोप करण्यात येत होते. रतन हिचा विवाहित मुलगा प्रकाश तुंबडा हा खलाशाचे काम करीत असून मासेमारी हंगाम संपल्याने ३ ते ४ महिन्यांनी घरी आला. त्यानंतर या भांडणाचे स्वरूप आई विरुद्ध मुलगा असे झाले. हा वाद पुढे पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. घोलवड पोलिसांनी हे प्रकरण चिखले तंटामुक्त समितीकडे वर्ग केले. दरम्यान, या समितीचे अध्यक्ष बच्चूभाई माच्छी, यज्ञेश पाटील, अशोक किणी, शरद पाटील, अनिरुद्ध पाटील या सदस्यांनी तुंबडा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या नातेसंबंधातील आत्मीयता सांगितली शिवाय जादूटोण्याच्या आरोपामुळे होणारे कायदेशीर परिणाम व शिक्षा या बद्दल समज दिली. भोंदुबाबा स्वार्थासाठी फसवणूक करतो हेही पटवून दिले. (वार्ताहर)