शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत मच्छीमार विरुद्ध शिवसेना वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:47 IST

कारवाईवरून वादंग : कोळी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

कल्याण: पूर्वेकडील महत्वाचा मानला जात असलेल्या ‘यु’ टाइप रस्त्यालगत असलेल्या पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यावरून मच्छीमार विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला आहे. या कारवाईमुळे मच्छी विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहावर टाच आल्याचा आरोप राज्य कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

फेरीवाले आणि टपरीधारकांच्या झालेल्या अतिक्रमणाच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या उपोषण आंदोलनात कल्याण पूर्व विधानसभा शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांच्यासह पूर्वेतील सेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेना, महिला आघाडी, राष्ट्र कल्याण पार्टी आणि विविध सामाजिक संघटना सहभागी झाले होते. दरम्यान अतिक्रमणावर कारवाई केली जाईल या केडीएमसी प्रशासनाच्या लेखी पत्रानंतर संध्याकाळी आंदोलन मागे घेतले. मात्र अतिक्रमणावर सुरू झालेल्या कारवाईमुळे आता नवा वाद उभा राहिला आहे.शिवसेनेचे शरद पाटील यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांना हाताशी धरून मच्छी मार्केटवर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडल्याचा आरोप राज्य कोळी महासंघाचे भोईर यांनी केला आहे. पाटील यांचे या परिसरात हॉटेल आहे त्या व्यवसायात मच्छी विक्रेत्यांचा अडथळा येतो म्हणून कोळी-आगरी समाजाची कुटुंबे उदध्वस्थ करण्याचे षडयंत्र पाटील यांनी रचले, असा आरोप भोईर यांनी केला. कोळसेवाडीत शिवसेनेची शाखा स्थापन होण्याआधीपासून मच्छी विक्रेते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याऐवजी शिवसेना या समाजाला उदध्वस्थ करीत आहे, असे भोईर म्हणाले.भोईर यांचे आरोप निरर्थक आहेत. माझ्या हॉटेलचा आणि पदपथावरील अतिक्रमणावरील कारवाईचा काहीही संबंध नाही. पदथावर जे अतिक्र मण होईल ते हटविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केलेली आहे. नागरीकांसाठी पदपथ हे मोकळेच असले पाहिजेत. त्यावर अतिक्रमण करणारे भाजी विक्रेते असतील तर त्यांच्यावरही कारवाई झालेली आहे. भविष्यात जेव्हा रस्ता रूंदीकरण होईल तेव्हा त्याठिकाणी कोणतेच अतिक्रमण राहणार नाही.- शरद पाटील, सहसंपर्क प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Shiv Senaशिवसेना