शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शिवसेनेच्या कोंडीवर रंगली चर्चा, विरोधाचे राजकारण भोवल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 03:40 IST

सततच्या विरोधी राजकारणामुळे आणि टोकाच्या विरोधामुळे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांची भेट घेत आर्थिक मदतीसाठी नाकदुºया काढाव्या लागल्याची खुमासदार चर्चा कल्याण-डोंबिवलीच्या भाजपामध्ये सुरू आहे.

कल्याण : सततच्या विरोधी राजकारणामुळे आणि टोकाच्या विरोधामुळे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांची भेट घेत आर्थिक मदतीसाठी नाकदुºया काढाव्या लागल्याची खुमासदार चर्चा कल्याण-डोंबिवलीच्या भाजपामध्ये सुरू आहे. त्यावर उघड भाष्य करण्यास भाजपाचे पदाधिकारी किंवा नगरसेवक तयार नाहीत. पण शिवसेनेने घेतलेल्या भेटीनंतर कल्याण-डोंबिवलीची कामे मार्गी लागली असे चित्र निर्माण होऊन त्याचे श्रेय त्या पक्षाला मिळू नये यासाठी भाजपाचे नगरसेवकही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन थेट निधी मिळवतील आणि प्रकल्प मार्गी लावतील, अशा हालचाली सुरू आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिकेपाठोपाठ मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढताना शिवसेना-भाजपाने विरोधाची भाषा करताना परस्परांवर यथेच्छ चिखलफेक केली. कल्याण-डोंबिवलीत दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. पण त्यानंतरही त्यांच्यातील विरोधाची धार कमी झालेली नाही. दोन्ही पक्षांत गेल्या साधारण दोन वर्षांत ताळमेळ नाही. सतत एकमेकांवर कुरघोडी करणे, श्रेयवादावर तोंडसुख घेणे, असे प्रकार वारंवार सुरू आहेत. सत्ता काबीज करता न आल्याचे शल्य राहिल्याने मुख्यमंत्री विकास निधी देताना हात आखडता घेतात, असे थेट आरोप स्थानिक सत्ताधारी शिवसेनेकडून होऊ लागले आणि ही घुसमट आयुक्तांच्या दालनाबाहेरील आंदोलनातून समोर आली. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी विकास निधी तसेच मोठे प्रकल्प मंजूर करूनही शिवसेना खोटे व विरोधाचे राजकारण करीत असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. यातून पालिकेची कोंडी होत गेली आणि सततच्या विरोधाच्या राजकारणामुळे शिवसेनेवर पक्षप्रमुखांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांची मनधरणी करण्याची वेळ ओढवल्याचे भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत ११४ कोटींचा निधी महापालिकेला देण्यात आला. स्मार्ट सिटीचे १०० कोटी रुपये आले आहेत, ५५ कोटी सीसीटीव्हीसाठी देण्यात आले आहेत. रिंगरूटसाठी सव्वा दोनशे कोटीची निविदा काढण्यात आली आहे. १८० कोटींचा विकास आराखडा ग्रामीण भागाच्या विकासासाठी तयार करण्यात आला आहे, याकडे लक्ष वेधताना महापालिकेच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्र्यांवर का फोडता? असा सवाल भाजपा नेत्यांनी केला आहे. याबाबत उघडपणे भाष्य केले जात नसले; तरी मुख्यमंत्री-शिवसेना भेटीमुळे भाजपाचे मनोबल मात्र वाढले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी मागण्यांच्या पूर्ततेचे श्रेय लाटण्याची संधी भाजपा त्या पक्षाला मिळवून देणार नाही. तो पक्ष आता स्वत:चा अजेंडा राबवेल हे स्पष्ट आहे.मनोमिलन की अस्तित्वाचा लढा?कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या प्रचारापासून शिवसेना-भाजपातील संघर्ष कडवा बनला. शिवसेनेने वाघनखे बाहेर काढली, तर मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा करत आम्ही सिंह असल्याचे जाहीर केले होते.आता जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका संपल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटत कामे मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न ही मनोमीलनाची भाषा आहे की पुढील दोन वर्षांसाठीच्या अस्तित्त्वाचा लढा आहे, याबाबात वेगवेगळे तर्क सुरू आहेत.शिवसेनेला भाजपाच्या ताकदीचा अंदाज आल्याचे हे द्योतक आहे, की येत्या दोन वर्षांत निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर मतदारांना प्रत्यक्षात दिसतील अशी कामे दाखवावी लागतील, या वस्तुस्थितीची जाणीव झाल्याचे हे लक्षण आहे, असा प्रश्न अधिकाºयांना पडला आहे.क्लस्टर, पुनर्विकासठरणार कळीचाकल्याण-डोंबिवलीतील प्रकल्पांची कोंडी फोडायची असेल, स्टेशन परिसराचा विकास करायचा असेल आणि पालिकेच्या गंगाजळीत भर घालायची असेल तर आधी जाहीर केल्यानुसार दिवाळीपूर्वी क्लस्टर मार्गी लागणे गरजेचे आहे. तसेच धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरणही प्रत्यक्षात येणे गरजेचे असल्याचे मत शङर नियोजनाच्या अभ्यासकांनी मांडले. ते धोरण ठरण्यास जेवढा उशीर होईल, तेवढे प्रश्न बिकट होत जातील, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या मुद्द्यांवर शिवसेनेने मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या होत्या.पैशांचे सोंग आणणार कसे?शिवसेनेच्या तक्रारीनंतर आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असले, तरी पालिकेकडे करांचा पुरेसा पैसा नाही. त्यामुळे जोवर राज्य सरकारचा हात सैल सुटत नाही, तोवर आयुक्त तरी काय करणार असा पालिका अधिकाºयांचा प्रश्न आहे.आता ठेकेदार चालले का?मीरा-भार्इंदरच्या प्रचारात शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर ठेकेदारांकडून निधी गोळा करून निवडणूक लढवणारे असा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून निधीची मागणी करताना ठेकेदाराकडचा पैसा चालेल का, अशी तिरकस प्रतिक्रिया डोंबिवलीतील भाजपाच्या नेत्याने दिली.