शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत कृषी विभागाची रोपवाटिका पाणी सिंचनासाठी चाळीस लाखांची उधळण; निकृष्ट बांधकाम करून भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 18:22 IST

विशेष म्हणजे २५ सप्टेंबर पर्यंत काम अर्धवट असताना परेश चौधरी यांच्या तक्रारी नंतर ठेकेदाराने प्रशासना सोबत हातमिळवणी करीत रंगरंगोटी करून काम पूर्ण झाल्याचे भासविले असल्याचा आरोप देखील मनसेचे चौधरी यांनी केला आहे .

- नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळ रोपवाटीकेस पाणी सिंचनासाठी काँक्रेट पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च करण्यात आले असून या निधीतून २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट व तकलादू केले असून योजना पूर्ण होण्या आधीच ठेकेदारास काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देत सर्व रक्कम अदा केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे .

 विशेष म्हणजे २५ सप्टेंबर पर्यंत काम अर्धवट असताना परेश चौधरी यांच्या तक्रारी नंतर ठेकेदाराने प्रशासना सोबत हातमिळवणी करीत रंगरंगोटी करून काम पूर्ण झाल्याचे भासविले असल्याचा आरोप देखील मनसेचे चौधरी यांनी केला आहे .

 राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली असता ठाणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मार्फत फळ रोपवाटिका असलेल्या ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाणी साठविण्यासाठी २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेली पाण्याची काँक्रीट टाकी उभारण्यात आली आहे त्यासाठी ३२ लाख ६४ हजार २१ रुपये व बोअर वेल बांधण्यासाठी ८ लाख ६३ हजार ४२ रुपये असे एकत्रित ४१ लाख २७ हजार ६३ रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.

परंतु या ठिकाणी उभारलेली टाकी ही जुन्या काँक्रीट पिलर्स वरच उभारली असून त्यासाठी तकलादू साहित्य वापरात निकृष्ट काम केले असून त्या बाबत तक्रार केल्या नंतर सदरच्या टाकीस ठेकेदाराने प्लास्टर न करताच रंगरंगोटी केली असून बोअरवेल अजून लावली नसतानाच कृषी विभागाने ठेकेदारास सर्व रक्कम दिली असल्याचे पुरावे परेश चौधरी यांनी माहिती अधिकारात मिळविले असल्याचे स्पष्ट केले आहे. 

 फळरोपवाटीकेस पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा या साठी शासन आटापिटा करत असतांनाच रोपवाटीकेत विहीर असून तेथील पाणी थेट रोपवाटीकेत देणे शक्य असताना त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करीत साठवणूक टाकी उभारण्याची गरजच काय , या भ्रष्ट कारभाराची शासनाने पुन्हा चौकशी करावी व ठेकेदारावर व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनविसेनेचे परेश चौधरी यांनी दिली आहे. 

तर पाण्याच्या टाकीकॅगे काम उत्तम झाले असून त्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुदेश भास्कर यांनी दिली आहे.