शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सरळगाव नाक्यावर होतेय गुरांमुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 22:40 IST

वाहनचालक त्रस्त; वाहतूक पोलिसाची गरज

मुरबाड : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर सरळगाव येथील नाक्यावर वाहतूक पोलिसाची गरज आहे. मात्र, याठिकाणी पोलिसांची नियुक्ती झालेली नसली तरी मोकाट गुरे वाहतूक नियंत्रणाचे काम करत असल्याचे दिसत आहे. भररस्त्यात ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना जोखमीचे ठरत आहे. कधीकधी तर गाडीतून उतरून या गुरांना पळवावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.मुरबाड-कल्याण-माळशेज या राष्ट्रीय महामार्गावर सरळगाव येथील नाक्यावरून शहापूर, नाशिक, कल्याण, आळेफाटा, नगर या दिशेने वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच मुरबाड-शहापूर हा मार्ग तीन वर्षांपासून बंद असल्याने खोपोली आणि मुरबाड, पनवेल या ठिकाणच्या एमआयडीसीतील अवजड वाहने सरळगाव मार्गेच जात असल्याने सरळगाव येथे सतत ट्रॅफिक जॅमची समस्या असते. त्यातच या मार्गावर मोकाट जनावरांचा कळप ठाण मांडत असल्याने ही परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. या जनावरांमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने या नाक्यावर वाहतूक पोलिसांची गरज आहे.महामार्गावरील सरळगाव येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठी बाजारपेठ आहे. दरमंगळवारी आठवडाबाजाराचा दिवस असल्याने भाजीपाला घेऊन आलेल्या वाहनांची वर्दळ असते. तसेच, राष्ट्रीय महामार्ग असल्याने माळशेज, आळेफाटा, कल्याणसह येणाऱ्या व जाणाºया वाहनांची वाहतूक सातत्याने सुरू असते. त्यामुळे मोकाट जनावरे दिवसभरासह रात्री येथील रस्त्यावर वावर असतो. त्यामुळे अनेक वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, एकेरी वाहतूक करावी लागत आहे. रात्री रस्त्यावर बसलेली जनावरे पटकन दिसत नसल्याने मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे सरळगाव ग्रामपंचायतीने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांसह नागरिक तसेच वाहनचालक करत आहेत.‘गुरांचा बंदोबस्त करू’सरळगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विलास जाधव यांच्याशी संपर्कसाधला असता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच यावर निर्णय घेऊन मोकाट जनावरांबाबत नोटीस काढून मालकांना तशा सूचना देऊ न बंदोबस्त करू, असे सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी