शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन सुरु : ग्रंथांचा ठेवा आॅनलाइनदेखील देण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:58 IST

येथील मराठी ग्रंथसंग्रहालयातील १८ लाख पानांचे संपूर्ण डिजिटायझेशन होणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे ३ लाख पानांचे डिजिटायझेशन करण्यात येईल.

ठाणे : येथील मराठी ग्रंथसंग्रहालयातील १८ लाख पानांचे संपूर्ण डिजिटायझेशन होणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे ३ लाख पानांचे डिजिटायझेशन करण्यात येईल. दररोज सुमारे १० हजार पाने स्कॅन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या आधी १७७७ दुर्मीळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सोमवारी सुरु वात झाली. ग्रंथसंग्रहालयातील उर्वरित सर्व ग्रंथांचे डिजिटायझेशन करणे तसेच या पुस्तकांची दर्जेदार वेबसाइट आदींसाठीदेखील जिल्हा प्रशासनातर्फे आर्थिक साहाय्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्र मातून हा आगळावेगळा उपक्र म जिल्हाधिकाºयांनी हाती घेतला असून त्यांनी पदभार घेताच ग्रंथसंग्रहालयाची ही मागणी मान्य करून ५० लाखांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी यापूर्वी अशा प्रकारे डिजिटायझेशन करण्यास अनुकूलता दर्शवली होती. जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना निधी हस्तांतरित करून त्यांच्यामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येत असून येत्या मार्चपर्यंत तो पूर्ण होणे अपेक्षित आहे. ग्रंथालयात सध्या १७७७ दुर्मीळ पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांची एकूण पृष्ठसंख्या २,९०,७१० आहे. यासह इतर सर्व पुस्तकांची १८ लाख पाने असून यामध्ये ३४४ काव्याशी संबंधित, २२८ नाटकाची, १९४ इतिहासाची, १७८ निबंधाची, १४९ चरित्र, १४३ कादंबºया, ७७ संकीर्ण, अध्यात्माची ५१, धर्मावर आधारित ५२ तर वैद्यक ५१ तसेच गणितशास्त्राची ४४, पौराणिक ४१, १६ शब्दकोश आदी प्रकारांची पुस्तके असून त्यांचे डिजिटायझेशन होणार आहे. नुकतीच या कामाला सुरु वात झाल्याने सध्या वेग कमी असला, तरी तो भविष्यात वाढेल, असा विश्वास हे काम करणारे राहुल गुंजाळ आणि श्रीनिवास कोंगे यांनी सांगितले.अशी चालते प्रक्रिया-दोन्ही पाने एकावेळी स्कॅन होतील, अशा पद्धतीने पुस्तक ठेवतात. स्कॅन पानांचा दर्जा तपासून आवश्यक त्या दुरु स्त्या करून प्रकरणाचे इंडेक्सिंग केले जाते.अंतिम मसुदा पीडीएफ व जेपीजीमध्ये रूपांतरित करून सर्व्हरवर सेव्ह केला जातो.