शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलचोरीचा डाव सुरक्षारक्षकांमुळे फसला, चोरांकडून दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 01:01 IST

ठाकुर्लीनजीक केडीएमटीच्या खंबाळपाडा आगारात उभ्या केल्या जात असलेल्या कचरागाड्यांमधील डिझेलचोरीचा प्रयत्न तेथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री फसला.

कल्याण : ठाकुर्लीनजीक केडीएमटीच्या खंबाळपाडा आगारात उभ्या केल्या जात असलेल्या कचरागाड्यांमधील डिझेलचोरीचा प्रयत्न तेथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री फसला. या सुरक्षारक्षकांवर चोरट्यांनी दगडफेक केली. कोणालाही दुखापत झाली नसली, तरी दगडफेकीत एका घंटागाडीची काच फुटली.खंबाळपाडा परिसरात केडीएमटीच्या आगारासाठी आरक्षित जागा आहे. तेथे केडीएमटीच्या बस उभ्या करण्याचे आणि डिझेलपंप उभारण्याचे प्रस्तावित आहे. ती जागा सध्या कच-याच्या गाड्यांनी बळकावली आहे. हे आगार असुरक्षित आहे. रविवारी रात्री तेथील कचºयाच्या गाडीतून डिझेल चोरण्याचा प्रयत्न झाला. पण सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. केडीएमसीने तेथे महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे सहा सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यातील संतोष शिंदे आणि सचिन शेलार हे दोघेच रात्रपाळीला होते. रात्री १० च्या सुमारास यातील शिंदे गस्त घालत असताना त्यांना चार ते पाच जणांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसले. त्यांनी ते शेलार यांना सांगितले आणि दोघांनी त्यांना हटकले तेव्हा ते पळाले, पण पळताना त्यांनी दगडफेक केली. यात त्यांना दुखापत झाली नाही. परंतु, घंटागाडीची काच फुटून नुकसान झाले. आगारात शिरलेल्या चोरट्यांकडून कचºयाच्या गाडीतील डिझेल चोरले जात होते. तेथे दोन डिझेलने भरलेले मोठे कॅन आणि डिझेल काढण्यासाठी वापरलेला पाइप सापडला. या घटनेची माहिती पालिकेचे वरिष्ठ सुरक्षारक्षक सुरेश पवार यांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन टिळकनगर पोलिसांना बोलावले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.सुरक्षा राखायची तरी कशी?असुविधा असलेल्या खंबाळपाडा आगारात सुरक्षा राखायची तरी कशी, असा सवाल येथील सुरक्षा कर्मचाºयांकडून उपस्थित होत आहे. अपुºया लाइटची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची बोंब आणि स्वच्छतागृहाचा अभाव यात सुरक्षारक्षकांची पुरती दमछाक होताना दिसते.आगाराच्या पाठीमागील भागात वसाहत वसली असून त्या वसाहतीसाठी वाटही या खंबाळपाडा आगारातूनच असल्याने सुरक्षा राखणे जिकिरीचे होऊन बसल्याचे येथील कर्मचाºयांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी या आगारातील गाड्यांमधील बॅटºया चोरीला गेल्या होत्या. परंतु, सुरक्षारक्षकांकडून याची भरपाई घेताना त्यांना प्रशासनाने निलंबित केले होते.एकीकडे सुविधा पुरवल्या नसताना अशाप्रकारची केलेली कारवाई कर्मचाºयांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. विशेष म्हणजे एखादी घटना घडल्यानंतरच जाग येते, या उक्तीनुसार रविवारची घटना घडताच तेथे तत्काळ तात्पुरत्या स्वरूपात विजेची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले.