शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘आधारवाडी’तील कचऱ्यात डिझेलच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:23 IST

कल्याण : दरवर्षी उन्हाळ्याला प्रारंभ होताच आधारवाडी डम्पिंगला आग लागते. ही आग लागते की लावली जाते? असा संशय ...

कल्याण : दरवर्षी उन्हाळ्याला प्रारंभ होताच आधारवाडी डम्पिंगला आग लागते. ही आग लागते की लावली जाते? असा संशय वारंवार व्यक्त केला जातो. परंतु, शनिवारी पहाटे डम्पिंगला लागलेल्या आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना डिझेलने भरलेल्या चार ते पाच बाटल्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाटल्या डम्पिंगच्या कचऱ्यात ठरावीक अंतराने दडवून, खुपसून ठेवल्या होत्या. येथील आगींसंदर्भात केडीएमसी प्रशासनाने याआधी गुन्हेही दाखल केले आहेत. परंतु, काहीच निष्पन्न झालेले नाही. मात्र, आता डिझेलच्या बाटल्यांवरून आग मुद्दाम लावण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आतातरी मनपा याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षापर्यंत डम्पिंगवर ६५० टन कचरा टाकला जात होता. परंतु, काही महिन्यांपासून मनपा हद्दीत शून्य कचरा मोहीम राबविली जात असल्याने डम्पिंगवर कचरा टाकण्याचे प्रमाण आजमितीला अवघे ४० ते ४२ टनावर आले आहे. दरम्यान, दरवर्षी उन्हाळ्यात येथील डम्पिंगला आग लागते. उन्हात कचरा तापतो, त्यात कचऱ्यामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात, असे कारण दिले जात होते. परंतु, वारंवार घडणाऱ्या घटना पाहता आगी कोणीतरी लावत असल्याच्या तक्रारी खडकपाडा पोलीस ठाण्यात मनपाने केल्या आहेत.

१६ मार्चला डम्पिंगला आग लागली होती. रात्री ९.३० च्या सुमारास डम्पिंगला लागलेली आग खोलवर गेल्याने पुढे पाच दिवस धुमसतच होती. मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीसह ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्यापर्यंत पसरले होते. डम्पिंगला लागून असणारा सीएनजी पंप बंद ठेवण्यात आला होता. या आगीच्या घटनेचीदेखील खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी पहाटेही डम्पिंगला आग लागली होती. तिच्यावर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु, डम्पिंगवर आग विझविण्याचे काम करणाऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना डम्पिंगच्या परिसरात डिझेल भरलेल्या बाटल्या निदर्शनास पडल्या. सहसा कोणालाही दिसणार नाहीत अशा छुप्या पद्धतीने त्या बाटल्या कचऱ्यात ठेवण्यात आल्या होत्या.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार माहिती

- यासंदर्भात कल्याण अग्निशमनचे अधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी डम्पिंगवर डिझेलच्या बाटल्या आढळल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

- तर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी आपण आगीच्या घटनांसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र डिझेलच्या बाटल्यांबाबत आपणास माहिती नाही. त्याची माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

------------------------