शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रस्ता रुंदीकरणातून केडीएमसीने साधले काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:40 IST

केडीएमसीने कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाºया पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यात नागरिकांना चालणेही जिकिरीचे होऊन बसल्याने

प्रशांत माने । कल्याण : केडीएमसीने कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाºया पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यात नागरिकांना चालणेही जिकिरीचे होऊन बसल्याने हा रुंदीकरणाचा घाट घातला आणि तो यशस्वीही झाला. परंतु, या रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. तसेच रस्त्यातील दुभाजकामुळे रस्ता पुन्हा अरुंद झाल्याने रुंदीकरणाने काय साधले, असा सवाल उपस्थित होत आहे.रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत केडीएमसी प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १६ रस्त्यांची कामे हाती घेतली होती. यात आतापर्यंत केवळ कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले. मात्र, त्याचा फटका व्यापाºयांना बसला खरा, पण पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी वाढीव बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे, ज्या इमारतींचा वापर निवासाकरिता होत होता, तो रस्ता रुंदीकरणानंतर व्यावसायिक कामांसाठी होऊ लागला आहे. महापालिकेच्या कृपाशीर्वादामुळे या रुंदीकरणात व्यापाºयांचे चांगभलं झाल्याचेही पाहावयास मिळाले. रस्ता रुंद करताना येथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. परंतु, रुंदीकरणानंतरची परिस्थिती पाहता फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. त्यात या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांचे बस्तान आणि मधोमध असलेल्या दुभाजकाने रस्त्याची बहुतांश बाजू व्यापल्याने या रस्तारुंदीकरणाचे फलित शून्य असल्याचे पाहावयास मिळत आहे.डोंबिवलीतील केळकर रोड आणि दीनदयाळ पथचेही रुंदीकरण महापालिकेकडून केले जाणार होते. परंतु, यासंदर्भात रहिवासी आणि व्यापाºयांना बजावलेल्या नोटिसाच चुकीच्या असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने मांडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू होण्यास तूर्तास विलंब लागणार आहे.दरम्यान, कल्याणमधील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रुंदीकरण झालेल्या मार्गावरची अतिक्रमणाची स्थिती पाहता अन्य रस्त्यांच्या रुंदीकरणानंतरही तेथे अतिक्रमणाचे चित्र कायम राहण्याची दाट शक्यता आहे.