शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये दुसऱ्या दिवशीही धुराचे लोट

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

येथील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मंगळवारी लागलेली आग रात्री उशिरा नियंत्रणात आली. मात्र, धुराचे लोट कायम राहिल्याने बुधवारीही डम्पिंग धुमसत होते.

कल्याण : येथील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मंगळवारी लागलेली आग रात्री उशिरा नियंत्रणात आली. मात्र, धुराचे लोट कायम राहिल्याने बुधवारीही डम्पिंग धुमसत होते. डम्पिंग परिसरात दुपारी असलेल्या वाऱ्यामुळे आगीचे प्रमाण वाढले होते. त्यातून, निर्माण झालेला धूर शहरातील बहुतांश भागांत पसरला होता. यावर, पूर्णपणे नियंत्रण मिळवणे शक्य होत नसल्याने आता डम्पिंगवर मातीचा भराव टाक ण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. दरम्यान, या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. वाढती आग आणि धूर पाहता डम्पिंगला लागून असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले होते. वारा मोठ्या प्रमाणावर वाहत होता. त्यामुळे आगीचा धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरला. त्यामुळे तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला, मळमळणे आदी त्रास झाला. डम्पिंगच्या आगीच्या धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरले होते. आग विझवण्यासाठी महापालिकेच्या नऊ अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग रात्री उशिरापर्यंत विझलेली नव्हती. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहताच ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर येथील अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप गुंड यांच्या नेतृत्वाखाली हे आॅपरेशन सुरू होते. परंतु, धुराचे लोट सुरूच राहिल्याने बुधवारीही डम्पिंगवर पाणी मारणे सुरू होते. यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पाण्याचे टँकर पुरवण्यात आले. दरम्यान, आग आणि धूर आटोक्यात आणण्यासाठी डम्पिंगवर मातीचा भराव टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी दिली. (प्रतिनिधी)आगीच्या घटना संशयास्पद जानेवारीपासून आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. चालू वर्षात २, ११, ३१ जानेवारी, २१ मार्च आणि २८ मार्चला आग लागली होती. २०१० मध्ये डम्पिंगला मोठी आग लागली होती. त्याची पुनरावृत्ती मंगळवारी झाली. एकाच वेळी डम्पिंगच्या मोठा परिसराला आग लागणे, ही बाब संशयास्पद असल्याचेही बोलले जात आहे.