शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'गरजू महिलांसाठी 'धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना' सुरू करावी'

By अजित मांडके | Updated: March 3, 2023 17:08 IST

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरीब गरजू व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांसाठी दरवर्षी समाज विकास विभाग व महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून विविध योजना राबवित असून या योजनांचा लाभ गरजू महिला घेत आहेत.

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून गरीब गरजू व आर्थिकदृष्टया मागास महिलांना घरघंटी, शिवणयंत्र व मसाला कांडप मशीन यंत्र खरेदीकरिता थेट अर्थसहाय्य देण्याबाबतची योजना नव्याने महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबवावी व या योजनेस धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना हे नाव द्यावे या मागणीचे पत्र शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के व शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांची भेट घेवून दिले.

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरीब गरजू व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांसाठी दरवर्षी समाज विकास विभाग व महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून विविध योजना राबवित असून या योजनांचा लाभ गरजू महिला घेत आहेत. या योजनांची व्याप्ती वाढविणे आवश्यक असून जास्तीत जास्त महिलांना योजनांचा लाभ घेता यावा व वैयक्तिक स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी घरघंटी, शिवणयंत्र व मसाला कांडप मशीन उपलब्ध करुन दिल्यास याचा लाभ निश्चितच महिलांना होणार असून तशी मागणी देखील महिलांनी केली असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने या योजनेतंर्गत विधवा, परित्यकता, घटस्फोटित, ४० वर्षावरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी, दारिद्य रेषेखालील प्रमाणपत्रधारक, सर्वसाधारण महिला व कोविड या आजाराने ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांचा समावेश करण्यात आला आहे. याच धर्तीवर ठाणे महानगरपालिकेनेही ही योजना 'धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना'  या नावाने सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.