शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचा "मंगळागौर" कार्यक्रम, विविध खेळांचे सादरीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 17:10 IST

धनगर प्रतिष्ठान आयोजित मंगळागौर कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. 

ठळक मुद्देधनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचा "मंगळागौर" कार्यक्रमविविध खेळांचे सादरीकरण महिलांना लकी ड्रॉ द्वारे पैठणी बक्षीस

ठाणे :  धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने खास धनगर समाजातील महिलांसाठी ‘चला खेळुया मंगळागौर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चाललंय. तरीदेखील काही संस्थांनी मंगळागौर साजरी करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे  मंगळागौरीच्या खेळातून महिलांच्या मनाला आनंद तर मिळतच असतो मात्र शरीराला व्यायामही होतो. आता महिला नोकरी करणाऱ्या असल्यामुळे मंगळागौर जागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु हा पारंपरिक खेळ टिकला पाहिजे यासाठी धनगर  प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही  ‘चला खेळुया मंगळागौर’ कार्यक्रम आयोजित केला होता याचे उदघाटन नगरसेविका नंदिनी विचारे,नगरसेविका परीषा सरनाईक,समाजसेविका तनुजा वीरकर,भारती चौगुले,नगरसेविका प्रतिभा मढवी,नम्रता कोळी यांच्या हस्ते झाले यावेळी माजी नगरसेविका विशाखा खताळ,उद्योजिका उज्वला गलांडे,नारी शक्ती ब्रिगेड अध्यक्षा निर्मला पाल,यशवंत सेना ठाणे जिल्हा संघटक ज्योती भंडारे,मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर,उपाध्यक्ष सुजाता बुधे, सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,आदी यावेळी उपस्थित होते."नखुल्याबाई नखुल्या, चंदनाच्या टिकुल्या, एक टिकली उडाली, गंगेत जाऊन बुडाली, "किस बाई किस दोडका किस, दोडक्‍याची फोड लागते गोड',झिम पोरी झिम अशी अनेक गाण्यांवर महिलांनी खेळ खेळून मंगळागौर साजरा केला. यावेळी मंगळागौर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉ द्वारे पैठणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती समाजसेविका तनुजा वीरकर यांच्या हस्ते रेशमा लबडे यांना लकी ड्रॉ पैठणी देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपखजिनदार संगीता खटावकर,सदस्य अश्विनी पळसे,रतन वीरकर, सुचिता कुचेकर,सुषमा बुधे,स्नेहा खटावकर,सीमा कुरकुंडे,सुजाता भांड,सल्लागार अर्चना वारे,मीना कवितके तसेच धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव अमोल होळकर, खजिनदार अविनाश लबडे,उपाध्यक्ष संतोष बुधे, प्रचारप्रमुख कुमार पळसे, कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,सुरेश भांड,सल्लागार सुनील राहिंज, प्रसाद वारे,मनोज खाटेकर,महेश पळसे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई