शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय कुलकर्णी न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:31 IST

डोंबिवली पूर्वेचा भाजपा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याला कल्याण न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली. दरम्यान, कुलकर्णीच्या जामिनासाठी त्याच्या वकीलाने केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कल्याण : बंदी असलेल्या शस्त्रांची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी अटकेत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता तथा डोंबिवली पूर्वेचा भाजपा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याला कल्याण न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली. दरम्यान, कुलकर्णीच्या जामिनासाठी त्याच्या वकीलाने केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.मानपाडा रोड परिसरात असलेल्या महावीर नगरातील अरिहंत इमारतीमध्ये ‘तपस्या हाऊस आॅफ फॅशन’ या दुकानात बंदी आणलेल्या शस्त्रांचा साठा बाळगणाऱ्या कुलकर्णीला कल्याण गुन्हे शाखेने १४ जानेवारी रोजी अटक केली. कुलकर्णी आधी न्यायालयीन कोठडीत होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास होऊ शकला नसल्याचे कारण देत तपास अधिकाºयांनी त्याची पोलीस कोठडी मागितली. मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.>पोलिसांची लपवाछपवी आणि पळवापळवीमंगळवारी कल्याण न्यायालयात आणण्यात आलेल्या कुलकर्णीला पत्रकारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी कल्याण न्यायालयात उपस्थित असलेल्या पत्रकारांची दिशाभूल करुन पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयीन प्रक्रिया आटोपताच पोलिसांनी कुलकर्णीला अक्षरश: पळवत नेत गाडीत बसवले. यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्यांनी पळवापळवीचे हे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केले.