शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

उल्हासनगरात रखडली १०७ कोटींची विकासकामे

By admin | Updated: March 21, 2017 01:47 IST

महापालिका निवडणुक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरही शासनाच्या परिपत्रकामुळे उल्हासनगरमधील कोट्यवधींची

उल्हासनगर : महापालिका निवडणुक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरही शासनाच्या परिपत्रकामुळे उल्हासनगरमधील कोट्यवधींची विकासकामे रखडल्याचा आरोप स्थायी समिती सभापती सुनिल सुर्वे यांनी केला आहे. हे परिपत्रक सरकारने मागे घ्यावे, अशी मागमी करत त्यांनी या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. राज्यातील इतर महापालिकांसोबतच उल्हासनगर महापालिकेची निवडणूक होऊन २३ फेबु्रवारीला निकाल लागले. २४ फेबुवारीला आचारसंहिता संपष्टात आली. उल्हासनगरमध्ये नव्या नगरसेवकांची सत्ता येण्यास जवळपास महिनाभराचा अवधी आहे. एकत्र निवडणुका घेण्याची आयोगाची गरज म्हणून या निवडणुका लवकर झाल्या. आधीच्या सत्ताधाऱ्यांची मुदत ४ एप्रिलला संपत असल्याने महापौराची निवड ३ एप्रिल रोजी होणार आहे. तोवर जवळपास ३८ दिवसांचा कालावधी मिळतो. त्यात पालिकेची खोळंबलेली विकासकामे मार्गी लागावी, अशी आशा नगरसेवकांसह सत्ताधारी शिवसेनेची होती. पालिकेची निवडणूक पार पडल्याने आधीच्या नगरसेवकांची महासभा आणि स्थायी समितीची बैठक घेण्यास सरकारने संमती दिली. मात्र स्थायीच्या बैठकीत, महासभेत धोरणात्मक निर्णय, आर्थिक बाबींशी निगडीत निर्णय घेऊ नये, असे निर्देश सरकारच्या परिपत्रकात आहेत. त्यामुळे विकासकामाला खीळ बसल्याचा आरोप सुर्वे यांनी केला. राज्य सरकारच्या परिपत्रकामुळे पालिकेच्या स्थायी समिती सभापतींसह नगरसेवकांची कोंडी झाली. या नगरसेवकांची मुदत ४ एप्रिलला संपत आहे. त्यामुळे निर्णय घेण्यावर बंधन का? असा प्रश्न सुर्वे यांनी सरकारसह निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांना केला. जानेवारीपूर्वी शहरातील १०७ कोटींपेक्षा जास्त कामाच्या निविदा काढून त्या कामाला मंजुरी दिली. स्थायी समिती अशा कामाचे कार्यादेश का देऊ शकत नाही? असा प्रश्न सुर्वे यांनी केला आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. विविध विकासकामाच्या निविदा निघून कार्यादेश व प्रशासकीय मंजुरी मिळाली. मात्र स्थायी समितीने मंजुरी दिली नसल्याने १०७ कोटींपेक्षा जास्त विकासकामे रखडली. नियमानुसार कार्यादेश आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ४० दिवसात त्यांना मंजुरी देणे बंधनकारक आहे, असा मुद्दाही त्यांनी मांडला. उल्हासनगर पालिकेसह जेथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यांना कामाचे श्रेय मिळू नये म्हणून असे परिपत्रक काढले असावे, अशी शंका सुर्वे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)