शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

विकासाचा फायदा ग्रामीणसह शहरी नागरिकांना, एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 06:27 IST

विकासाच्या नव्या संधींचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी नागरिकांना करून देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रोथ सेंटर, बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्यसेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट आदींचा समावेश असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनामिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगितले.

ठाणे -  विकासाच्या नव्या संधींचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी नागरिकांना करून देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रोथ सेंटर, बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्यसेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट आदींचा समावेश असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनामिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगितले.साकेत मैदान येथे मुख्य सरकारी कार्यक्रम झाला. शेतकºयांच्या कर्जमाफीविषयी बोलताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांप्रमाणेच जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यावर ५० कोटी १६ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम जमा झाली. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे जिल्ह्याची सिंचनक्षमता सात हजार हेक्टरने वाढली आहे. रब्बीच्या दुबार क्षेत्रात सुमारे साडेतीन हजार हेक्टरने वाढ झाली असून चार हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली. पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात जागतिक दर्जाचा स्कायवॉक बांधण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात दळणवळण सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटीरु ग्णालय करण्यासाठी प्रक्रि या सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.संचलनामध्ये राज्य राखीव दलासह ठाणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, कारागृहरक्षक, गृहरक्षक, कमांडो पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, दंगलविरोधी पथक यांचा समावेश होता. महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा जाधव, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पोलीस आयुक्त परमवीर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, पालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष मंजूषा जाधव यांनी झेंडावंदन केले. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सीईओ विवेक भीमनवार उपस्थित होते. दरम्यान, आटगाव विभाग हायस्कूलमध्ये अध्यक्ष संजय निमसे यांनी पूजन केल्यानंतर अरुण शेलार यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. तसेच चित्रकला-हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन रवि घावट यांच्या हस्ते झाले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे