शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:33 IST

मुंबई महापालिकेचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. परंतु, दुसरीकडे ठाणे महापालिकेचा विकास आराखडा मागील २५ वर्षांत ११ टक्केच राबवण्यात आला आहे.

ठाणे : मुंबई महापालिकेचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. परंतु, दुसरीकडे ठाणे महापालिकेचा विकास आराखडा मागील २५ वर्षांत ११ टक्केच राबवण्यात आला आहे. यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास झाला नसून वाहतूककोंडीची समस्या पावलोपावली जाणवते.ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. शहरातील विविध भागांतून ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणारे रस्ते आजही अरुंद आहेत. त्यामुळे आता हा विकास आराखडा कधी पूर्णपणे राबवला जाणार, असा सवाल केला जाऊ लागला आहे. ठाणे महापालिकेचा विकास आराखडा १९९९ साली मंजूर झाला. तर, त्याचा काही भाग २००१ साली मंजूर करण्यात आला. आजघडीला शहरातून जाणारा मुंबई नाशिक आणि घोडबंदर भागातून जाणारा मुंबई-अहमदाबाद अशा दोन्ही महामार्गांवरील जंक्शनवर प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे. या मार्गांवर उड्डाणपूल उभारले असले तरी वाहतूककोंडी काही कमी झालेली नाही.ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाºया रस्त्यांवर वाहनांचा भार वाढला असून त्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे ऐन सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत ठाणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांची लांबी एकूण ३५६.४० किमी इतकी आहे. त्यापैकी १०८ किमीचे रस्ते काँक्रिट आणि यूटीडब्ल्यूटी पद्धतीने तयार केले आहेत. तर, उर्वरित २४८.४० किमीचे रस्ते डांबरी आहेत. डांबरी रस्ते सातत्याने उखडत असल्याने त्यावर सतत डांबराचा लेप चढवला जातो.या कामांच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु, वारंवार रस्ते उखडत असल्याने केलेला खर्च जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. यंदाही हीच समस्या जाणवत आहे.