शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी उभे राहण्याचा केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 01:22 IST

दिवंगत साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दर महिन्यात घेण्यात येणा-या या स्मृतिमालेच्या मार्च महिन्याच्या नवव्या पुष्पाचा विषय होता

ठाणे : महात्मा गांधींनी १९३० साली केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाला स्मरून आम्ही मिट्टी सत्याग्रह करीत आहोत. आमची माती, जमीन, संविधान आणि लोकशाही जपण्यासाठी शेतकरी आंदोलनाला समर्थन देऊन अहिंसात्मक मार्गाने लढण्याचा संकल्प समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांच्या रंगमंचावर कलाकार, कार्यकर्त्यांनी मतकरी स्मृतिमालेच्या कार्यक्रमात केला. 

दिवंगत साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दर महिन्यात घेण्यात येणा-या या स्मृतिमालेच्या मार्च महिन्याच्या नवव्या पुष्पाचा विषय होता ‘मिट्टी सत्याग्रह’. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मोरे हिने केले. प्रास्ताविकात मीनल उत्तुरकर यांनी शेतकरी आंदोलनाची भूमिका विशद केली. कोरोनासंबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करत पार पाडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी एकेक मूठभर माती एका कलशात जमा केली आणि मी मिट्टी सत्याग्रही अशा बॅनरवर स्वाक्ष-या केल्या. संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांनी सर्वांना मातीचा टिळा लावला.यावेळी किसननगरच्या मुलामुलींनी अत्यंत अनोखी नृत्य नाटिका सादर करून या विषयाचा महत्त्व प्रभावीपणे मांडले. तर अनुजा लोहार, दुर्गा माळी, प्राची डांगे, अंजली लोहार, मंगम्मा धनगर यांनी यह धरती अपनी है, अपना अंबर है रे.. या गाण्यावर नृत्य सादर केले. सुशांत जगताप, निशांत पांडे, ओंकार गरड यांनी शेतकरी आंदोलनावर त्यांचे विचार मांडले. प्राची डांगे हिने माणसे या अनिल अवचट यांच्या पुस्तकातील दुष्काळाने गरीब शेतकरी यांच्या झालेल्या भयंकर परवडीच्या वर्णनाचे अभिवाचन केले.

मिट्टी सत्याग्रह ठाण्याच्या वस्ती-वस्तींत नेणारमिट्टी सत्याग्रहाचा हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन संस्थेचे विश्वस्त आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सर्वांना केले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व कलाकारांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करून मिट्टी सत्याग्रहाचा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. 

या वेळी संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, शेतकरी कायद्यांबरोबरच सरकार जे कामगार विषयक कायदे आणत आहे ते मालकांच्या बाजूचे असून त्यामध्ये अशा नवीन तरतुदी आहेत की कामगार आपल्या अधिकारांसाठी लढू शकणार नाहीत. असुरक्षित कामगारांची संख्या आताच ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे ती अजून वाढेल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, सह खजिनदार अजय भोसले, ओमकार जंगम, प्रवीण खैरालिया आदींनी मेहनत घेतली.