शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

भाईंदरच्या ८ मित्रांनी फटाके फोडण्याचे केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 22:39 IST

फटाक्यांमुळे होणाराया ध्वनी व वायु प्रदुषणासह ज्येष्ठ, लहानांना होणाराया त्रासाचा केला विचार

धीरज परबमीरारोड - शाळेपासून एकमेकांचे मित्र असलेल्या आणि पुर्वी फटाक्यांचा शौक असणाराया ८ मित्रांनी यंदा पासुन फटाके न फोडण्याचा निर्धार अमलात आणला आहे. भाईंदरच्या बालाजी नगर परिसरात राहणाराया या १० ते १३ वी मध्ये शिकणाऱ्या मित्रांनी फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायु प्रदुषण, पर्यावरणाचा राहास तसेच लहान मुलं, रुग्ण व ज्येष्ठांना होणारा त्रास यासाठी यंदापासून फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. फटाके म्हणजे पैशांचे नासाडी असून त्या पैशांचा वापर सामाजिक कार्यासाठी करण्याचा विचार या मुलांनी बोलून दाखवला.फटाके फोडणे हे धर्म - संस्कृतित नसले तरी गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी म्हणजे फटाके फोडणे असे समिकरण झालेले आहे. फटाक्यां मुळे प्रचंड वायु आणि ध्वनी प्रदुषण होते. फटाक्यांचा धूर हा मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक असुन या काळात लोकांना श्वसनाचे आदी विकार जडतात. पर्यावरणाचा यातुन राहास होत असतो. केवळ मनुष्यांनाच नव्हे तर पक्षी, पशु व जिवांनादेखील फटाक्यांचा जाच असह्य असतो. लहान बालके, रुग्ण, ज्येष्ठ नागरीकांना फटक्यांच्या आवाज व धूरा मुळे त्रास सहन करावा लागतो.फटक्यांच्या वाजवण्यावर वेळेचे बंधन असुन फटक्यां विरोधात शासन आदी जनजागृतीचे संदेश देत असते. पण प्रत्यक्षात काटेकोर अमलबजावणी होताना दिसत नाही. हरित फटाक्यांचा पर्याय देखील शासन अजुन लोकांना उपलब्ध करुन देऊ शकलेले नाही. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या व्यवसाय आणि विक्रीत होणारी अब्जो रुपयांची उलाढाल देखील या पर्यावरण आणि मानवी आरोग्याला घातक अशा फटाक्यांना प्रोत्साहन देण्यास कारणीभूत मानली जाते.फटाक्यांचे आकर्षण लहानां मध्येच नव्हे तर मोठ्यां मध्ये देखील असते. हल्ली तर महागडे फटाके फोडणे देखील प्रतिष्ठेचे समजले जाते. परंतु भार्इंदरच्या बालाजी नगर मधील ८ विद्यार्थी मित्रांनी यंदाच्या दिवाळी पासुन फटाके फोडण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील अवी जैन, कृष्णा मुंदडा, आदर्श बोहरा, विशेष मुंदडा, विशाल पुरोहित, कुणाल केसवानी आणि गोविंद चौधरी हे बालाजी नगरच्या तिरुपती कॉम्पलॅक्स मध्ये राहणारे आहेत. तर हर्ष बागरी हा बालाजी नगर मध्येच रहात असला तरी तो पुर्वी तिरुपती कॉम्पलॅक्स मध्येच रहायचा.हे सर्व जण शाळेत असल्या पासुनचे मित्र आहेत. सर्व १६ ते १८ वयोगटातील असुन विशाल, विशेष, आदर्श व कृष्णा हे १० वीचे विद्यार्थी आहेत. गोविंद ११ वी मध्ये, अवी हा १३ वीत तर हर्ष, कुणाल हे दोघे १२ वीत शिकतायत. मध्यमवर्गिय कुटुंबातील ही मुलं असुन फटाके फोडण्याचा त्यांना लहानपणा पासुन शौक होता. कृष्णाच्या घरचे तर भरपुर फटाके आणुन फोडतात. पण यंदा घरच्यांनी फटाके आणले असले तरी कृष्णाने ते फोडण्यास नकार दिलाय. विशाल, आदर्श, विशेष, गोविंद, अवी, हर्ष व कुणालने देखील फटाके फोडण्याची इच्छा नसल्याचे घरच्यांना सांगुन टाकले.फटाक्यांसाठी इतके पैसे खर्च करुन शेवटी ते कचरायातच जातात. त्यापेक्षा गरजु - गरीबासाठी दिवाळीत काही मदत करु शकलो तर उलट त्यांच्या चेहरायावर देखील आपण दिवाळीचा आनंद आणु शकतो. लहान मुलं, रुग्ण, वडिलधारायांना फटाक्यांच्या आवाज आणि धूरा मुळे होणारा त्रास आम्ही विचारात घेतला असता आम्हाला जाणवले की, फटाके फोडुन आपण साध्य मात्र काहीच करत नाही आहोत. उलट त्यातुन लोकांना त्रास देत असल्याने फटाके फोडण्याची इच्छाच मनातून निघून गेल्याचे हे विद्यार्थी सांगतात.फटाक्यांमुळे आपल्याला इतका त्रास होतो तर निरागस पक्ष्यांना किती त्रास होत असेल. ध्वनी व वायु प्रदुषण होऊन पर्यावरणाचा राहास होण्यात आम्हाला भागीदार बनायचे नाही असे ही मुलं सांगतात. पर्यावरणासह मानवी आरोग्याला घातक अशा ध्वनी व वायु प्रदुषणासह पैशांची नासाडी रोखण्याचा विचार करुन या पुढे फटाके न फोडण्याचा निर्धार करणाराया या मित्रांचे परिसरात कौतुक होत आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी