शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ शहर हरित करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:06 IST

विशेष अभियान : ३० हजार झाडांचा संकल्प

अंबरनाथ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंबरनाथ शहर हरित शहर होण्याचा निर्धार केला असून यंदा शहरात ३० हजार झाडे लावण्यात येणार आहे. सायकल सिटी निर्माण करण्याचा संकल्प सोडण्यात आला, त्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पर्यावरण दिनानिमित्त विशेष अभियान आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा विजयी झाल्याबद्दल नगरपालिका प्रशासन आणि शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, मुख्याधिकारी देविदास पवार, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, उद्योजक विश्वनाथ पनवेलकर आदी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे, आमदार डॉ. किणीकर, शहरप्रमुख वाळेकर यांनी पनवेलकर सभागृह ते हुतात्मा चौकापर्यंत सायकली चालवून अभियानाला सुरुवात केली.

अंबरनाथमध्ये ३० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले.लोकसहभागासाठी आनंदवृक्ष, स्मृतिवृक्ष, अक्षय लागवड, शुभमंगल, माहेरची साडी वृक्षलागवड आदी योजना हाती घेतल्या आहेत. बचत गटामार्फत सायकली देण्यात येणार आहेत. त्यासाठी सायकल स्टॅण्डची निर्मिती केली जाणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने पालिका प्रशासन राबवत असलेल्या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे. निसर्गाची हानी थांबवावी, असे आवाहन नगराध्यक्षा वाळेकर यांनी केले.

शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. सायकलींसाठी नगरपालिकेने १० लाख रु पये मंजूर केले आहेत.रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या सोसायट्यांना करात सवलत देण्याचा प्रयत्न विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष विजय पवार यांनी केले.