शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रंगला आयुक्त विरुद्ध उमपहापौर सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका उपायुक्तांना सोपविलेल्या विभागात आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप उपमहापौर भगवान भालेराव यांनी ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिका उपायुक्तांना सोपविलेल्या विभागात आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला असून, उपायुक्त अशोक नाईकवाडे व प्रियंका राजपूत यांच्याकडील काही विभाग काढण्याची लेखी मागणी भालेराव यांनी केली आहे. जर ते विभाग काढून घेतले नाही, तर दालनाबाहेर उपोषण करण्याचा इशाराही भालेराव यांनी केला आहे. या प्रकाराने महापालिकेत आयुक्त विरुद्ध उपमहापौर असा सामना रंगल्याची चर्चा आहे.

उल्हासनगर महापालिकेला प्रथमच अतिरिक आयुक्त म्हणून करुणा जुईकर तर अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, प्रियंका राजपूत व सुभाष जाधव असे चार उपायुक्त मिळाले. उपायुक्त दर्जाचे चार अधिकारी मिळाल्याने महापालिकेत पारदर्शक व चांगले काम होणार असे वाटत होते. मात्र, उपमहापौर भगवान भालेराव यांनी उपायुक्त यांच्याकडे सोपविलेल्या विभागात आयुक्तांनी दुजाभाव करून काही उपायुक्तांना चांगले तर काहींना कमी दर्जाचे विभाग दिल्याचा आरोप केला आहे. उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्याकडील शिक्षण विभाग व महिला बालकल्याण विभाग तसेच उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभाग व भांडार विभाग काढून घेण्याची लेखी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. २९ जुलैच्या दुपारपर्यंत सोपविलेला विभाग काढला नाही, तर उपमहापौर दालनाबाहेर उपोषण करण्याचा इशारा भालेराव यांनी आयुक्तांना दिला आहे.

महापालिका उपायुक्तांकडील सोपविलेल्या विभागावरून आयुक्त डॉ.राजा दयानिधी व उपमहापौर भगवान भालेराव एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. कोरोना महामारीच्या काळात महापालिकेत कार्यरत असलेले एकमेव उपायुक्त मदन सोंडे यांनी चमकदार कामगिरी केली. मात्र, त्यांना बाजूला सारून कमी महत्त्वाचे विभाग दिल्याचा आरोप भालेराव यांनी केला. तसेच विभाग सोपविताना वरिष्ठ श्रेणीचा विचार केला नाही, असेही ते म्हणाले.

------------

हे तर प्रशासकीय कामकाज- आयुक्त डॉ. दयानिधी

महापालिका सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना विविध विभागांचा पदभार सोपविणे, हे प्रशासकीय काम आहे. उपमहापौर भगवान भालेराव यांचे उपोषण व उपायुक्तांकडे सोपविल्याबाबतचे पत्र मिळाले असून नियमानुसार काय कारवाई होते. त्यानुसार कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त. डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.