शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

उपमहापौरांच्या प्रभागात स्वच्छतागृहच नाही

By admin | Updated: September 26, 2015 22:54 IST

केडीएमसीतील बहुतांशी वॉर्डमध्ये मुलभूत सुविधांची वानवा आहे. एकही वॉड आयएसओ प्रमाणित नाही ही शोकांतिका. तरीही स्मार्ट सिटीच्या दिशेने महापालिकेची वाटचाल सुरु आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसीतील बहुतांशी वॉर्डमध्ये मुलभूत सुविधांची वानवा आहे. एकही वॉड आयएसओ प्रमाणित नाही ही शोकांतिका. तरीही स्मार्ट सिटीच्या दिशेने महापालिकेची वाटचाल सुरु आहे हा विरोधाभास नाही का असा सवाल जनतेला आहे. डोंबिवलीतील उपमहापौरांच्या वॉर्डात कोट्यवधींची कामे प्रस्तावीत असून त्यांना त्यांचा वॉर्ड आयएसओ प्रमाणित करायचा होता. परंतु, तो झालेला नाही. या ठिकाणी एमएमआरडीच्या माध्यमातून एका झोपडपट्टीत शौचालय बांधले असून ते एका खासगी मंडळाने चालवायला घेतले आहे. परंतु, त्या ठिकाणी प्रचंड गैरसोय असून तेथे शौचाला जाणे म्हणजे रोगाला आमंत्रण आहे. त्यासंदर्भात नगरसेवकाने वेळोवेळी ते महापालिकेकडे हस्तांतरीत करा अशा सूचना दिल्या. परंतु त्यासाठी कोणीही पुढे आलेले नसल्याने तो पेच सोडवतांना त्यांच्या नाकीनऊ आले. पेंडसेनगरच्या भागात गल्लोगल्ली सिमेंट काँक्रीटच्या होत आहेत, एलईडी दिवे लागले आहेत, काही ठिकाणी प्रस्तावीत आहेत. मात्र जे दिवे लावले होते, त्यातील ११४ पैकी काही तांत्रिक कारणाने बंद आहेत. एका गल्लीतील काँक्रीटचे काम झाले. त्यानंतर बाजूच्या रस्त्यावर पेव्हरब्लॉक न बसवल्याने रहिवाशांना दगडांमधून मार्ग काढतांना अडथळे येत आहेत. याच ठिकाणी पंचायत बावडी परिसरातील पारंपारीक विहिर स्वच्छ करण्यात आली. त्यातून दिवसाला ४० हजार लिटर पाणी मिळू शकते, परंतु, केवळ तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने ते पाणी वापरात नाही. यामुळे ते ड्रेनेजच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव कागदावरच आहे. या ठिकाणी पोलीस चौकी बांधली. परंतु रामनगर पोलीस ठाण्याकडून तेथे पोलीस पाठवले जात नाहीत. त्यामुळे ती बंद असल्याची टीका नागरिकांनी केली. या ठिकाणी अनेकदा चेन स्रॅचिंगच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. व्ही.पी.रोड एलईडी दिव्याचा करायचा होता तो अद्याप झाला नसून निवडणुकीच्या तोंडावर त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे का असा नागरिकाचा सवाल आहे. रोटरीच्या उद्यानात ओपन जीमची सोय असून तेवढाच काय तो नागरिकांना विरंगुळा आहे.