शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवला विंटेज कारचा थरार

By जितेंद्र कालेकर | Updated: January 12, 2025 21:42 IST

नविन आव्हाने स्वीकारण्याची सवय: एकनाथ शिंदे

ठाणे: महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात विकासात्मक कामे केल्यानेच विधानसभा निवडणूकीत मतदारांनी चांगला काैल दिला. महाविकास आघाडी ही नव्हतीच. ते केवळ निवडणूकीसाठी एकत्र आले हाेते. लाेकसभा निवडणूकीत त्यांनी केलेली फेकाफेकी विधानसभा निवडणूकीत मतदारांनी बंद पाडली.

आम्हाला नविन आव्हाने स्वीकारण्याची सवय असल्याचा टाेलाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधकांना रविवारी लगावला.ठाण्यात सिंघानिया समुहाच्या वतीने आयाेजित केलेल्या विंटेज आणि सुपर कारच्या प्रदर्शनाला शिंदे यांनी हजेरी लावली. प्रसिद्ध उद्याेगपती गाैतम सिंघांनिया यांच्यासमवेत त्यांनी विंटेज कारचा थरार अनुभवला. यावेळी एका रेसिंग कारचे ड्रिफ्टींगही त्यांनी केले. सुपर कार, सुपर बाईक आणि विंटेज कार चालविण्याचा नवा अनुभवही त्यांनी घेतला.

 यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हेही उपस्थित हाेते. ठाण्यात १० ते १२ जानेवारी असे तीन दिवस विंटेज कार आणि बाईकच्या प्रदर्शनाचे आयाेजन केले हाेते. यात एक हजार काेटींच्या ३२० प्रकारच्या १२५ वर्षांपेक्षा जुन्या विंटेज कारचा तसेच अत्याधुनिक सुपर कार आणि बाईकचा समावेश हाेता. यातील एका कारचे सारथ्य सिंघानिया यांनीही शिंदे यांच्यासमवेत केले. त्यानंतर स्वत: शिंदे यांनी रेसिंग कार चालवून आपल्याला नवीन आव्हाने स्वीकारण्याची सवय असल्याचे सांगून ठाणे शहर आता बदलत असल्याचे सांगितले. 

ठाण्यातील उपवन फेस्टीवल आणि वर्तकनगरच्या कार फेस्टचे त्यांनी काैतुक केले. केवळ उतुंग इमारती म्हणजे विकास नव्हे तर चांगले उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विकास कामे हाेणे यातूनही विकास हाेत असताे. गेल्या अडीच वर्षात राज्यात माेठी विकास कामे केल्यानेच मतदारांनी भरघाेस मतांनी महायुतीला निवडून दिले. महाविकास आघाडीने एकत्र लढावे की वेगळे हा त्यांचा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. शिंदे यांना बाईक आणि विंटेज कारचे सारथ्य केल्याचे पाहून ठाणेकरांनी त्यांना चांगलीच दाद दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे