शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी मागवला विभागनिहाय लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:14 IST

चुकीची माहिती दिल्यास कारवाई : महापालिका विभागप्रमुखांत खळबळ

सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिकेच्या खर्च व उत्पन्नात तफावत वाढल्याने गेल्या पाच वर्षांतील कामे व देयकांचा विभागनिहाय लेखाजोखा आयुक्तांनी मागवला आहे. चुकीची माहिती दिल्यास कारवाईचा इशारा दिल्याने विभागप्रमुखांत खळबळ उडाली आहे.

महापालिका अंदाजपत्रकात गैरवाजवी उत्पन्न गृहित धरून खर्च करण्यात आल्याने थकबाकी ७० कोटींवर गेली. अवाजवी खर्चाला आळा घालून पालिकेला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख पुढे सरसावले आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांचा लेखाजोखा विभाग प्रमुखांना सादर करण्याचे आदेश ११ जुलै रोजी काढले. आयुक्तांच्या आदेशानुसार बहुतांश विभागप्रमुखांनी लेखाजोखा सादर केला असून बांधकाम व पाणी पुरवठा विभाग त्याला अपवाद आहे. पूर्ण झालेली आणि सुरू असलेली कामे, तसेच सुरू न झालेल्या कामांचीही यादी आयुक्तांनी मागवली असून, ठेकेदारांच्या बिलाची सविस्तर सद्यस्थिती सादर करण्यास सांगितली आहे.

महापालिका बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, मालमत्ता विभाग, नगररचनाकार आदी विभाग आयुक्तांच्या टार्गेटवर असल्याचे समजते. आरोग्य विभागामार्फत कचरा उचलण्यावर वर्षाला १८ कोटी, डेब्रिज उचलण्यावर २ कोटी, डंम्पिंग ग्राऊंड सपाटीकरणावर ३ कोटींच्या खर्चासह इतर कामे केली जात असून ती कामे वादात सापडली आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत ३०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवून कोट्यवधीच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. २७९ कोटींची भुयारी गटार योजनेसह ३८ कोटींच्या खेमानी योजनेचे कामही अर्धवट आहे. बांधकाम विभागामार्फत कोट्यवधीच्या निधीतून रस्ते व इतर बांधकामे केली असून सर्वच बांधकामे वादात सापडली आहेत.

आयुक्त कारवाई करणार का?रस्ते दुरूस्ती व खड्डे भरण्यावर कोट्यवधीचा खर्च, शिक्षण मंडळ अंतर्गत कामे, अभ्यासिकेत ७५ हजारांचा एक कॅमेरा, डम्पिंग ग्राऊंड व कचऱ्यावरील खर्च, मलनिस:रणे व खेमानी नाला योजनेला वाढून दिलेला कोट्यवधीचा निधी आदीचा लेखाजोखा मिळाल्यानंतर संबधितांवर आयुक्त कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर