शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दंतचिकित्सकाची आत्महत्या की हत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:26 IST

पांडुरंगवाडीच्या ‘आदित्य हाइट्स’मध्ये राहणारे दंतचिकित्सक डॉ. सचिन कारंडे रविवारी रात्री घरात बेशुद्धावस्थेत आढळले. कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पांडुरंगवाडीच्या ‘आदित्य हाइट्स’मध्ये राहणारे दंतचिकित्सक डॉ. सचिन कारंडे रविवारी रात्री घरात बेशुद्धावस्थेत आढळले. कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. डॉ. कारंडे यांचे चुलत भाऊ कुणाल (रा. शंखेश्वरनगर, डोंबिवली पूर्व) यांनी रविवारी रात्री त्यांच्याशी वारंवार फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कुणाल यांनी डॉ. कारंडे यांचे घर गाठले. दरवाजा ठोठावूनही डॉ. कारंडे यांनी प्रतिसाद न दिल्याने कुणाल यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा ते घरात बेशुद्धावस्थेत आढळले. उपचारासाठी त्यांना आधी आयकॉन आणि नंतर रुक्मिणीबाई रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल, असे टिळकनगर पोलिसांनी सांगितले.डॉ. कारंडे यांची डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड आणि श्रीखंडेवाडी परिसरात क्लिनिक आहेत. ते १५ वर्षांपासून दंतचिकित्सक म्हणून काम करत होते. ते इंडियन डेंटिस्ट असोसिएशनचे सदस्य होते. डॉ. कारंडे यांच्या अकाली मृत्यूच्या बातमीने त्यांचे नातेवाईक व सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.