लोकमत न्यूज नेटवर्कआसनगाव : धामणी गावातील नऊ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धामणी येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.भिवंडीपाठोपाठ शहापूर तालुक्यातील धामणी येथेही डेंग्यूची लागण झाल्याने नागरिकांत भीती आहे. मनीषा भोईर (३२), विलास भोईर (५०), सचिन म्हसकर (१७), पंढरीनाथ म्हसकर (४५), नामदेव भोईर (३४), शेवंता भोईर (६५), मुकेश भोईर (२०), संगीता भोईर (३०) व गौरव भोईर (१६) या नऊ जणांना लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नऊपैकी चौघे शहापूर उपजिल्हा रु ग्णालयात दाखल असून एक ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. उर्वरित चौघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, धामणी येथे पाणीटंचाई असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. टंचाई असल्याने पाण्याचे साठे करून ठेवण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्यातूनच डेंग्यूची लागण झाल्याने पाणीटंचाईचा असाही फटका येथील ग्रामस्थांना बसला आहे. शहापूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातर्फे धामणी येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने घरोघरी जाऊन दूषित पाण्याचे साठे नष्ट केले. तसेच टेमीफास्ट केमिकलच्या साहाय्याने डेंग्यूच्या अळ्या नष्ट केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश नगरे यांनी सांगितले.
धामणी येथे डेंग्यूचे नऊ रुग्ण
By admin | Updated: May 13, 2017 00:54 IST