शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फादर स्टॅन स्वामी मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

ठाणे : सामाजिक न्याय आणि आदिवासींसाठी आयुष्य वेचणारे फादर स्टेन स्वामी यांचे न्यायालयीन कस्टडीत असताना निधन झाले होते. ८५ ...

ठाणे : सामाजिक न्याय आणि आदिवासींसाठी आयुष्य वेचणारे फादर स्टेन स्वामी यांचे न्यायालयीन कस्टडीत असताना निधन झाले होते. ८५ वर्षीय स्टेन स्वामी आजारी असताना त्यांची गंभीर अवस्था होईपर्यंत त्यांना योग्य उपचार न दिल्याने एका प्रकारे हा शासन पुरस्कृत खूनच आहे, असा आरोप करून येथील जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या पुढाकाराने विविध समविचारी संस्था संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी निदर्शने करून निषेध केला.

येथील कोर्टनाका येथे केलेल्या या निदर्शनात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, इंटक, म्युज फाउंडेशन, भारतीय महिला फेडरेशन, बहुजन असंघटित मजदूर संघटना, एसआयपी, समता विचार प्रसारक संस्था, आरएमपीआय आदी संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले, असे एपीएमचे महाराष्ट्र समन्वयक जगदीश खैरालिया यांनी सांगितले.

सरकारविरोधातील आवाज दाबून अप्रत्यक्षपणे हुकूमशाही गाजवत असून केंद्र सरकार संविधान विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, यूएपीए आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले गेलेले निरपराध कार्यकर्ते यांच्या बाबतीत योग्य व तातडीच्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ताबडतोब जामीन मंजूर करावा, यूएपीए सारखे सैतानी कायदे रद्द करावेत, संविधान बचाओ - देश बचाओ अशा मागण्यांचे निवेदन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्यामार्फत शुक्रवारी देण्यात आले. यावेळी भेटलेल्या खैरालिया यांच्यासह सचिन शिंदे, लक्ष्मी छाया पाटील, टी. ललिता, निर्मला पवार, सुब्रतो भट्टाचार्य, अजय भोसले, धोंडिराम खराटे, सुनील दिवेकर, उमाकांत पावसकर, लिलेश्वर बनसोड, भास्कर गव्हाळे, ओंकार गरड आदी कार्यकर्ते होते.

------