शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By धीरज परब | Updated: November 4, 2022 03:45 IST

...अन्यथा मच्छिमार समुद्रात एकजुटीने  पर्ससीन नेटच्या बोटी हुसकावून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.  

मीरारोड - बंदी असूनही संबंधित विभागाच्या आशीर्वादाने पर्ससीन नेट व एलईडी मार्फत बेकायदेशीर मासेमारी सुरू असून त्यांच्या बोटी जप्त करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी केली आहे. अन्यथा मच्छिमार समुद्रात एकजुटीने  पर्ससीन नेटच्या बोटी हुसकावून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.  

पर्ससीन नेट व एलईडी द्वारे मासेमारी करण्यास नौकांना ६ फेब्रुवारी २०१६ च्या शासन परिपत्रकानुसर वर्षातील बाराही महिने बंदी घातलेली आहे. तसे असताना देखील रायगड जिल्ह्यातून सुमारे २०० हून अधिक पर्ससीन नेट नौका एल.ई.डी. दिव्यांच्या मदतीने ठाणे - पालघर तसेच मुंबई परिसरातील समुद्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मासेमारी करत आहेत.

यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हक्काचे मासे हे पर्ससीन नेट वाले मारत आहेत. इतकेच नव्हे तर पर्ससीन नेट व एलईडी मुळे प्रचंड प्रमाणात लहान मासे व मत्स्यबीज नष्ट होत असल्याने एकूणच मासळीचे अस्तित्व धोक्यात येऊन मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. 

अश्या अवैध मासेमारीमुळे जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमार आणि अनधिकृत पर्ससीन नेट मच्छिमार ह्यांच्यात समुद्रात संघर्ष पेटू शकतो यामुळे जीवितहानी, नौकांची हानी देखील होऊ शकते. कायद्याने बंदी असलेल्या मासेमारीला रोखण्यासाठी पर्ससीन नौकंवरील मच्छिमारांवर कारवाई करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा तसेच भारतीय दंड साहिता नुसार अवैध मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती चे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Fishermanमच्छीमारthaneठाणे