शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेती घटल्याने सुपाची मागणी घटली; विक्रेत्या महिलेची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:43 IST

आळेफाटा येथील सूर्यवंशी ४० वर्षांपासून सूपविक्रीचा व्यवसात करत आहेत.

पंकज पाटील मुरबाड : शेतीशी निगडित असलेल्या पारंपरिक सुपांची विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. प्लास्टिकच्या सुपांमुळे पारंपरिक विणीचे सूप नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी आता शेतीसाठी सूप शक्यतो वापरत नाही. केवळ धार्मिक विधीसाठी सुपाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या पारंपरिक व्यवसायावर त्याचा परिणाम होत असल्याची भावना सूपविक्रेत्या चंपा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

मुरबाडची म्हसा यात्रा म्हणजे सर्वांचे आकर्षण. या यात्रेत पारंपरिक शेतीशी निगडित अवजारे, जनावरे, टोपली आणि सूप यांची मोठी विक्री होते. म्हसा यात्रेतील टोपली बाजारात गेल्या ४० वर्षांपासून सुपाचा व्यवसाय करणाऱ्या सूर्यवंशी यांनी आपली व्यथा मांडली. टोपलीच्या तुलनेत सुपाची मागणी कमी होत चालली आहे. शेतीचे प्रमाण कमी झाल्याने सुपांच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. काही भागात आजही शेती सुरू आहे, त्यामुळे ते शेतकरी आवर्जून सूप खरेदी करतात. मात्र, जी गावे शहराशी जोडली गेली आहेत, त्या गावात सुपांचे महत्त्व केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित राहिले आहे. हळद, लग्नसराई आणि पाचवीपूजन करताना काही ठिकाणी सुपाची गरज भासते. त्यासाठीच वापरले जाते. मात्र, पारंपरिक शेतीशी जोडले गेलेले सूप आता हव्या त्या प्रमाणात विकले जात नाही.

आळेफाटा येथील सूर्यवंशी ४० वर्षांपासून सूपविक्रीचा व्यवसात करत आहेत. पूर्वी १० रुपयांपासून सूप मिळत होते. आज महागाई वाढल्याने त्याच सुपाची किंमत आता २०० ते ३०० च्या घरात गेली आहे. मात्र, बाजारात प्लास्टिकचे सूप अल्प किमतीत मिळत असल्याने ते घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे असतानाही मंदीच्या काळातही सूर्यवंशी सुपाचा व्यवसाय करीत आहेत. वर्षभर विविध आठवडाबाजारांत सूपविक्री करून त्या आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. मात्र, म्हसाच्या यात्रेत खºया अर्थाने त्यांना दोन पैशांचा फायदा नक्कीच होतो. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांत हा फायदाही कमी होत चालला आहे.

एक सूप विणण्यासाठी दीड तास जातो. मात्र, त्याचा मोबदला म्हणून २०० रुपये देण्यासही ग्राहक तयार होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपली तिसरी पिढी या व्यवसायात असून पुढची पिढी हे काम करेल, असे वाटत नाही. पूर्वीसारखी मागणी नसल्याने आता आमचे नातवंडं या व्यवसायापासून दुरावत आहेत. तसेच या व्यवसायाकडे न वळता शिक्षण घेऊन दुसरा व्यवसाय करावा, असा सल्ला स्वत: सूर्यवंशी देतात.